सातारा : बॅंका, दूध संघ, कुकूटपालन, बझार अशा एकामागोमाग एक संस्था यांच्या नाकर्तेपणामुळे मोडीत निघाल्या. विकासाचे नुसते फुगवलेले आकडे सांगणाऱ्यांनी किती युवकांना रोजगार उपलब्ध करून दिला, किती शैक्षणिक संस्था, मोठी उद्योग, साताऱ्यात आणले याचे उत्तर द्यावे, असा सवाल सातारा- जावळी विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार अमितदादा कदम यांनी सातारा शहरातील विविध ठिकाणच्या पदयात्रे दरम्यान बोलताना केला.
सातारा- जावळी विधानसभा मतदारसंघातील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे उमेदवार अमित कदम यांच्या प्रचारार्थ प्रतापगंज पेठ, बुधवार नाका, लाकडी पूल, तेली खड्डा, गोखले हौद, न्हावी आळी, गडकर आळी, धुमाळ आळी, समाधी माळ, सर्वोदय कॉलनी, मोती चौक, फुटका तलाव, समर्थ हॉस्पिटल, गोल मारुती, सुपनेकर बोळ, मारवाडी चौक, कोटेश्वर मंदिर, अर्कशाळा नगर आदी भागात पदयात्रेने शिवसंवाद दौरा केला. त्यावेळी मतदारांशी हितगुज साधताना अमित कदम बोलत होते.
यावेळी सातारा शहर काँग्रेसच्या अध्यक्ष रजनीताई पवार, नगरपालिकेतील माजी विरोधी पक्षनेते ॲड. बाळासाहेब बाबर, शिवसेनेचे बाळासाहेब शिंदे, प्रा. संजीव बोंडे, काँग्रेस, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस व उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
अमितदादा कदम यांचे ठिकठिकाणी नागरिकांनी उस्फुर्त स्वागत केले. माता- भगिनींनी औक्षण करून त्यांना शुभेच्छा दिल्या. ठिकठिकाणी पदयात्रेत फटाक्यांच्या आतिषबाजीत आणि फुलांच्या वर्षावात स्वागत करण्यात आले. यावेळी मतदारांशी संवाद साधताना अमितदादा कदम म्हणाले, अजिंक्य उद्योग समूहाचे शिल्पकार आदरणीय कै. आमदार अभयसिंहराजे भोसले यांनी मोठ्या कष्टाने विविध सहकारी संस्था उभ्या करून त्या नावारूपाला आणल्या. तथापि त्यांच्या पश्चात सहकार मोडून खाण्याचे काम कोणी केलं याचे उत्तर विरोधकांनी जनतेला द्यावं, असेही अमितदादा कदम यावेळी बोलताना म्हणाले.
पदयात्रेत मोठ्या संख्येने कार्यकर्ते व नागरिक सहभागी झाले होते. अमितदादांनी पदयात्रा मार्गावरील प्रत्येक घरात जाऊन नागरिकांचे आशीर्वाद घेतले आणि त्यांच्याशी संवाद साधला. शिवसेनेचे शिवाजीराव इंगवले, शिवराज टोणपे, शिवसेनेचे जिल्हा उपसंघटक सादिकभाई बागवान, सुनील भोसले, निलेश शिंदे, गणेश अहिवळे, अमित नाईक, आशुतोष पारंगे, रवी भणगे, रफिक शेख, उमेदवार अमितदादा कदम यांच्या सुविद्य पत्नी शितल कदम, कविता बनसोडे, मीनल काळोखे, तेजस्विनी केसरकर, अंजली भुते, ऋतुजा भोसले, अनुपमा उबाळे, सुषमा कदम, वैशाली चिकणे, युवराज थोरात आदी कार्यकर्ते, महिला भगिनी पदयात्रेत सहभागी झाले होते.
