Explore

Search

April 12, 2025 7:44 pm

IAS Coaching
लेटेस्ट न्यूज़

Health News : रोज फक्त १ आवळा या पद्धतीनं खा

१० आश्चर्यकारक फायदे, पचनाचे त्रास दूर,चेहऱ्यावर येईल ग्लो

आवळा एक सुपर फूड आहे . आकाराला लहान दिसत असला तरी आवळ्यात चमत्कारीक गुण आहेत. यामुळे फक्त शरीराची इम्यूनिटी वाढत नाही तर आजारांपासूनही लांब राहता येतं. यात व्हिटामीन सी, व्हिटामीन एबी कॉप्लेक्स, पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम आयर्न, कार्बोहायड्रेट, फायबर्स आणि हाययुरेटीक एसिड असते. आवळ्यातील गुणांमुळे आवळा १०० आजारांवर औषध मानला जातो. आयुर्वेदात आवळ्याची तुलना अमृताशी करण्यात आली आहे. योगगुरू बाबा रामदेव यांनी आपल्या एका व्हिडिओत आवळा खाण्याचे फायदे सांगितले आहेत.

डायबिटीजवर फायदेशीर

आवळा डायबिटीसची समस्या टाळण्यासाठी फायदेशीर ठरतो. आवळ्यात क्रोमियम तत्व असते ज्यामुळे इंसुलिन हॉर्मोन्स मजबूत होतात. आवळ्याच्या रसात मध मिसळून प्यायल्यास अधिक फायदे मिळतील.

हृदयाचे आरोग्य चांगले राहते

आवळ्यातील क्रोमियम बीटा ब्लॉकरचा प्रभाव कमी करतात. ज्यामुळे हृदयाचे आरोग्य मजबूत आणि हेल्दी राहते. आवळ्यामुळे बॅड कोलेस्टेरॉल कमी होऊन चांगले कोलेस्टेरॉल वाढते.

डायजेशन चांगले राहते

अन्न पचवण्यासाठी आवळा फायदेशीर ठरते. यामुळे गॅस, आंबट ढेकर, गॅसची समस्या कमी होते. आवळा कोणत्या ना कोणत्या स्वरूपात तुम्ही  आहारात घेऊ शकता. आवळ्याची चटणी, मुरांबा,  लोणचंही खाऊ शकता.

वजन कमी करण्यास मदत होते

आवळा खाल्ल्यानं शरीराचा मेटाबॉलिझ्म मजबूत होतो ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. आवळा एक लो कॅलरी पदार्थ आहे. याच्या सेवनानं  वजनही नियंत्रणात राहतं.

इम्यूनिटी वाढते

आवळ्यात बॅक्टेरिया आणि फंगल इन्फेक्शनपासून  लढण्याची शक्ती असते. आवळा खाल्ल्यानं शरीराची इम्यूनिटी वाढते. यामुळे आजार दूर राहतात. टॉक्सिन्स बाहेर पडण्यास मदत होते. आवळा खाल्ल्यानं खोकला, सर्दीही होत नाही.

हाडं मजबूत राहतात

आवळा खाल्ल्यानं हाडांना ताकद मिळते. आवळ्यात भरपूर कॅल्शियम असते. जे खाल्ल्यानं ऑस्टिओपोरोसिस, अर्थरायटिस आणि सांध्याच्यां वेदनांपासून आराम मिळतो.

डोळ्यांसाठी फायदेशीर

आवल्याचा रस डोळ्यांसाठी गुणकारी ठरतो यामुळ धुसर दिसणं, दृष्टी कमकुवत होणं यांसारखे गंभीर त्रास टाळण्यास मदत होते.

ताण कमी होतो

आवळ्यात काही पोषक तत्व असतात ज्यामुळे मेंदू थंड राहण्यास मदत होते. आवळ्याच्या सेवनानं ताण-तणाव कमी होतो आणि झोपही चांगली  येते.

प्रजननसंस्था चांगली राहते

रोज आवळे खाल्ल्यानं पुरूषांमध्ये शुक्राणूंची क्रियाशिलता वाढते आणि महिलांची अंडाशयांची गुणवत्ता चांगली राहते. ज्यामुळे प्रजननसंस्था चांगली राहण्यास मदत होते.

Rayat Darpan
Author: Rayat Darpan

Leave a Comment

Live Tv
Advertisement
लाइव क्रिकेट स्कोर
Infoverse Academy