रविवार दि. 17 नोव्हेंबर रोजी ब्रह्मचारी निरंजनानंद ,(वेदमूर्ती धनंजय शास्त्री वैद्य) यांचे प्रवचन
सातारा : आपल्या धार्मिक परंपरेतील रामायण, महाभारत यामध्ये जी जीवनमूल्य सांगितले आहेत ती आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनात तंतोतंत आढळतात. धर्म जपण्यासाठी अनेक ग्रंथ वाचू नका, तर प्रभू श्रीरामाला समजून घ्या. रामा सारखे वागण्याचे प्रयत्न करा. छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन अभ्यासताना ते किती विलक्षण आहे व त्यांची स्तुती किती करावी हे सांगण्यास शब्दच नाहीत. धर्माची पहिली आवृत्ती श्रीराम असून त्यानंतरची आवृत्ती हे छत्रपती शिवराय आहेत. हे मी फार जबाबदारीने बोलत आहे, मी कुठे बोलतोय व कोणापुढे बोलतोय याचे मला भान आहे. संपूर्ण जीवनात छत्रपती शिवरायांच्या द्वारे कोणतीच चूक दिसत नाही. काम, क्रोध, लोभ, मदाचे एकही लेश त्यांच्या जीवनात दिसत नाहीत. पुरुषार्थाचे जीवन राम जगले, असेच जीवन छत्रपती शिवराय ही जगले. असे गौरव उद्गार अयोध्या श्रीराम मंदिराचे कोषाध्यक्ष परमपूज्य गोविंद देवगिरी महाराज यांनी सज्जनगड येथे काढले.
सज्जनगड येथील श्री समर्थ सेवा मंडळाचे वतीने आयोजित केलेल्या अमृत महोत्सवी सोहळ्यानिमित्त शनिवारी दुपारी उपस्थित मान्यवर समर्थ भक्तांपुढे बोलताना गोविंद देवगिरी पुढे म्हणाले, की छत्रपती शिवरायांची स्तुती स्वतः समर्थांनी केली. जाणता राजा काय असावा, हे त्यांच्या चरित्राकडे पाहिल्यावर समजून येते. सध्या शिवचैतन्य जागरण यात्रा सुरू केली असून, यावेळी गोविंद देवगिरी यांनी उपस्थित सर्वांकडून शिवस्तुतीचे गायन करून घेतले.
परकीय स्वत: यांनी छत्रपतींची निंदाच केली. पापी, परकीयांनी जे चरित्र दिले ते समाजापुढे आणण्याचा प्रयत्न झाला. मात्र खुद्द स्वामी विवेकानंदांनी तमिळनाडूमध्ये आपल्या कार्यकर्त्यांनी छत्रपती बाबत दरोडेखोर असा केलेला उल्लेख पूर्णपणे क्रोधित होऊन आपण सर्वांनी छत्रपतींचे चरित्र नीट जाणा असे सांगितले. खुद्द स्वामी विवेकानंदांनीही कवी भूषण यांनी केलेली कविता ते स्वतः अनेकदा गुणगुणत असत. आज छत्रपतींची कथा धार्मिक व्यासपीठावरून चर्चिली गेली पाहिजे, असा ठाम आग्रह यावेळी गोविंद देवगिरी यांनी केला.
दरम्यान आपण धर्म जपण्यासाठी अनेक ग्रंथ वाचू नका तर रामरायाला समजून घ्या त्याच्यासारखे वागण्याचा प्रयत्न करा त्यामुळे आपोआपच आपण धर्मनिष्ठ होऊन जाऊ आणि धर्माचे सरकार व्हायचे ठरवले, तेव्हा त्रेतायुगात रामराया अवतरले आणि कधी युगात खुद्द छत्रपती शिवाजी महाराज अवतरले असेही त्यांनी सांगितले.
सज्जनगडावर आयोजित या अमृत महोत्सवी सोहळ्यामध्ये शनिवारी सकाळी वाराणसी येथील गणेश शास्त्री द्रविड यांचे मार्गदर्शनपर प्रवचन झाले. त्यानंतर आयोध्या येथील श्रीराम मंदिर न्यासाचे कोषाध्यक्ष व श्रीकृष्ण जन्मभूमी मथुरा न्यासाचे मुख्य प्रवर्तक श्रीमद परमपूज्य गोविंद देवगिरी महाराजांचे सज्जनगडावर आगमन झाल्यावर, त्यांच्या 75 व्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सज्जनगड समर्थ सेवा मंडळाचे वतीने त्यांची नाणी तुला करण्यात आली. हा तुला भार कार्यक्रम संपन्न होताना यावेळी स्वामीजींना त्यांच्या जन्मतारखेच्या अनुसार क्रमांक असलेल्या विविध नोटांचे केलेले आकर्षक मानपत्र ही मंडळाचे वतीने प्रदान करण्यात आले. विविध प्रकारच्या नाण्यांनी त्यांची तुला करताना मंडळाचे अध्यक्ष गुरुनाथ महाराज कोटणीस रामदास स्वामी संस्थानचे विश्वस्त प्रसाद स्वामी, वेदमूर्ती विवेक शास्त्री गोडबोले, ज्येष्ठ निरूपणकार मंदाताई गंधे, मंडळाचे कार्यवाहक योगेश बुवा रामदासी आदींची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समर्थ भक्त मकरंद बुवा रामदासी यांनी केले.
सज्जनगड येथील श्री समर्थ सेवा मंडळाचे अध्यक्ष कोटणीस महाराज यांच्या हस्ते गोविंद गिरी यांचा शाल, श्रीफळ, रामनामी, राम मंदिराची प्रतिकृती आणि नोटांचे सन्मानपत्र देऊन सत्कार केल्यानंतर शांती निमित्त तुला भार पूजन करण्यात आले. आणि त्यानंतर स्वामींना तुले मध्ये बसवून गंगालयात विविध नाणी टाकून त्यांची तुला करण्यात आली. यावेळी योगेश बुवा रामदासी यांनी स्वामींचा पुष्पहार घालून सत्कार केला …जय जय रघुवीर समर्थ, प्रभू श्रीरामचंद्र की जय, आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय.. जयजयकाराने परिसर दुमदुमून गेला होता.
या कार्यक्रमात सज्जनगड येथे उभारण्यात आलेल्या आयोध्या येथील श्री राम मंदिराच्या प्रतिकृती चे निर्माणकर्ते समर्थ सेवा मंडळाचे प्रमुख मार्गदर्शक आणि कार्यकर्ते जयेश भाई जोशी व ज्या कलाकारांनी यासाठी तब्बल दीड महिना अहोरात्र परिषदेने घेतले. असे मुंबई येथील हेमंत उपाध्याय व सुनील निमकर या कलाकारांचा सत्कार स्वामी गोविंद देवगिरी यांचे हस्ते करण्यात आला. रविवार दि. 17 नोव्हेंबर रोजी सकाळी साडेसात ते दुपारी एक या वेळेत वैदिक याज्ञिकांच्या हस्ते पंचायतन याग सुरूच राहणार असून सकाळी नऊ ते साडेदहा या वेळेत वसई येथील राष्ट्रीय अध्यक्ष धर्मसभा विद्वत संघाचे प्रमुख परमपूज्य ब्रह्मचारी निरंजनानंद, (वेदमूर्ती धनंजय शास्त्री वैद्य) यांचे प्रवचन होणार आहे. त्यानंतर सकाळी 11 ते 12.30 या वेळेत कर्नाटकातील माणिकनगर येथील श्री माणिकप्रभू संस्थानचे पिठाधिपती परमपूज्य सद्गुरु ज्ञानराज माणिक प्रभू महाराज यांचे प्रवचन होणार आहे. दुपारी चार ते सहा या वेळेत माणिक नगर येथील माणिकप्रभू संस्थानचे सचिव परमपूज्य श्री आनंदराज माणिक प्रभू महाराज यांचे सुश्राव्य भजन कार्यक्रम होणार असून रात्री नऊ वाजता सुप्रसिद्ध गायिका कु. आर्या आंबेकर यांची गायन सेवा सादर होणार आहे.
