Explore

Search

April 9, 2025 6:01 am

IAS Coaching
लेटेस्ट न्यूज़

Political News : मी अर्ज भरला त्याचदिवशी निवडणूक जिंकलीय : जयकुमार गोरे

खटाव : मी गेली 15 वर्षे माण-खटावच्या स्वाभिमानी मातीची आणि मायबाप जनतेची ईमानेइतबारे सेवा केली आहे. दुष्काळमुक्तीची लढाई अंतिम टप्प्यात आणली आहे. जनतेचे आशीर्वाद कायमच माझ्या पाठीशी राहिले असल्याने माझा अर्ज भरला त्याच दिवशी मी निवडणूक जिंकली आहे. माझा आदर्श घेऊन अनेक युवकांनी व्यायाम सुरु करुन तब्ब्येत चांगली करण्याचा आदर्श घेतला आहे. नको ते उद्योग करणार्‍या प्रभाकर घार्गेंचा युवकांनी कोणता आदर्श घ्यायचा, असा सवाल माण-खटाव विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आ. जयकुमार गोरे यांनी उपस्थित केला. माण तालुक्यातील मलवडी येथील जाहीर सभेत ते बोलत होते.

आ. जयकुमार गोरे पुढे म्हणाले, 15 वर्षांपूर्वी माण-खटाव मतदार संघात खूप विदारक परिस्थिती होती. गावोगावी रस्ते, पाणी, वीज या मूलभूत सुविधांची वानवा होती. दुष्काळी परिस्थिती जनतेला सतावत होती. मी इथल्या मायबाप जनतेला दुष्काळमुक्तीचे स्वप्न दाखवले. ते स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी जीवापाड मेहनत केली. पाण्याचे फेरवाटप करण्यासारखा क्रांतिकारी निर्णय घेण्यात आला. आता तर उरमोडी, जिहे-कठापूर, तारळीचे पाणी येत असून टेंभू योजनेची कामे सुरु झाल्याने दुष्काळमुक्ती दृष्टिक्षेपात आली आहे. मी पाणी आणले म्हणूनच त्यांनी साखर कारखाना सुरु केला. पाणी आणि ऊसाची शेती नसती तर त्यांनी कारखान्यात काय कुसळं घातली असती का?

आ. गोरे पुढे म्हणाले, विरोधक माझा खूप द्वेष करतात. मी बारामती, फलटणकरां समोर झुकत नाही, याचे त्यांना शल्य आहे. मी पाणी आणून दुष्काळमुक्ती अंतिम टप्प्यात आणतोय हे त्यांना सहन होत नाही. म्हणूनच गेल्या 15 वषार्र्ंत त्यांनी मला एकही दिवस सुखाने जगून दिले नाही. त्यांनी मला दिलेल्या त्रासाची फिकीर नाही कारण जनतेचे आशीर्वाद माझ्यावर कायम राहिले आहेत. प्रत्येक निवडणुकीत विरोधकांनी मला चक्रव्यूहात अडकवण्याचे प्रयत्न केले. पण त्यांचे इप्सित कधीच साध्य झाले नाही.

गावोगावी ‘जय हो’चा उठाव झालाय..

माण-खटावमध्ये जयाभाऊ नावाच्या वाघाने पाणी आणले आहे. इतरांच्यात दम नव्हता. जे शब्द आमदारांनी दिले ते पूर्ण करुन दाखवले. गावागावांतून ‘जय हो’चा उठाव झाला आहे. रात्रंदिवस जनतेसाठी झटणार्‍या आ. गोरेंच्या पाठीशी दोन्ही तालुके ठाम उभे राहिले आहेत. विरोधकांनी धसका घेऊन निवडणूक सोडून देण्याची मानसिकता केली असल्याचे महायुतीच्या पदाधिकार्‍यांनी सांगितले.

Rayat Darpan
Author: Rayat Darpan

Leave a Comment

Live Tv
Advertisement
लाइव क्रिकेट स्कोर
Infoverse Academy