Explore

Search

April 9, 2025 5:27 am

IAS Coaching
लेटेस्ट न्यूज़

Satara News : कोणी काहीही म्हणो सातारा – जावळीचा विकास हा माझा शब्द : अमितदादा कदम

सातारा : उरमोडी व महू -हातगेघरच्या कालव्यांची कामे पूर्ण करणार, बोंडारवाडीचा प्रश्न मार्गी लावणार, सातारा एमआयडीसीचा विकास, सातार्‍यात आयटी क्षेत्र येण्यासाठी पायाभूत सुविधांचा विकास, हा माझा शब्द आहे. महाविकास आघाडीच्या माध्यमातून ही कामे करण्यासाठी पुढची पाच वर्षे मी कार्यरत राहीन, असा विश्वास सातारा- जावळी विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार अमितदादा कदम यांनी व्यक्त केला.
सातारा- जावळी विधानसभा मतदारसंघातील शरदचंद्र पवार राष्ट्रवादी कॉंग्रेस, राष्ट्रीय कॉंग्रेस व उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे उमेदवार अमितदादा कदम यांच्या प्रचारार्थ शेंद्रे, वेचले, भाटमरळी, कुसावडे, पिलानी, परमाळे, आसनगाव, मापरवाडी, कुमठे, शिवाजीनगर, शेळकेवाडी, सोनगाव, वळसे, भरतगाव वाडी तसेच डबेवाडी, अंबवडे, भोंदवडे, काळोशी, लावंघर, लुमनेखोल, सावली, पोगरवाडी, करंडी, शहापूर, जकातवाडी आदी गावांमध्ये अमित कदम यांनी झंजावाती शिवसंवाद पदयात्रा दौरा केला. त्यावेळी मतदारांशी संवाद साधताना ते बोलत होते. दरम्यान, सातारा शहरातील समर्थ मंदिर येथून अमितदादा कदम यांच्या उपस्थितीत राजवाडा, मोती चौक, प्रतापगंज पेठ, राधिका रोडमार्गे बारटक्के चौक व तेथून बुधवार नाका या मार्गावरून हातात पेटत्या मशाली घेऊन मशाल फेरी काढण्यात आली. यावेळी अमितदादा कदम यांनी ठिकठिकाणी मतदारांशी संवाद साधला.
लेक लाडकी अभियानाच्या प्रवर्तक ड. वर्षा देशपांडे, कॉंग्रेसच्या शहराध्यक्ष रजनीताई पवार, उपाध्यक्ष माधवी वरपे, सौ. शितल कदम, कविता बनसोडे, मालती जावळे, तेजस्विनी केसरकर, अंजली भुते, ऋतुजा भोसले, सुषमा कदम, वैशाली चिकणे, ड. शैला जाधव, शिवसेनेचे जिल्हा उपसंघटक सादिकभाई बागवान, शिवसेनेचे शहराध्यक्ष रवींद्र भणगे, बाळासाहेब शिंदे, शिवाजीराव इंगवले, शिवराय टोणपे, राजू नाईक, युवराज थोरात, अनुपमा उबाळे, गणेश अहिवळे, मिनाज सय्यद, नागरिक व ग्रामस्थ उपस्थित होते.
अमितदादा कदम म्हणाले, चोवीस तास उपलब्ध असणारा नेता म्हणून विरोधक स्वतःचा प्रचार करत आहेत. नुसते उपलब्ध असून उपयोगाचे नाही तर लोकांचे प्रश्न सोडवण्याची इच्छाशक्ती असली पाहिजे. माझा लढा कोणा व्यक्तीविरुद्ध नाही तर विकासाचे कारण सांगून दबावाचे राजकारण केले जात आहे त्या विरुद्ध आणि सातारा जावळीचा स्वाभिमान जागृत करण्यासाठी आहे. शहर सुशोभीकरण व शहराचा दर्जा वाढवणे, एमआयडीसी विकास व बाहेरून उद्योग येण्यासाठी पोषक वातावरण करणे यावर माझा आगामी काळात भर राहील.
परळी व जावळी खोर्‍यातील दुर्गम भागात दळणवळण सुविधा देणार, स्थानिक समस्या गावनिहाय सोडवण्यासाठी अग्रक्रम, मुंबईत स्वतंत्र समिती स्थापन करून तेथील नागरिकांच्या समस्या सोडवणार, तरुणांसाठी व्यवसाय प्रशिक्षण कार्यक्रम राबवणार. मुंबई- पुणे येथील मूलनिवासी सातारकरांसाठी स्वतंत्र मदत कक्ष स्थापन करण्यात येईल, असा शब्दही अमित दादा यांनी यावेळी बोलताना दिला.

Rayat Darpan
Author: Rayat Darpan

Leave a Comment

Live Tv
Advertisement
लाइव क्रिकेट स्कोर
Infoverse Academy