कर्जतच्या सभेत शरद पवारांनी जाहीर केले
विधानसभा निडणुकीच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस. दरम्यान राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज कर्जतमध्ये रोहित पवारांसाठी प्रचार सभा घेतली. यावेळी त्यांनी, रोहित पवार पहिल्या टर्ममध्ये केवळ आमदार होते, आता ते दुसऱ्या टर्मसाठी उभे आहेत. त्यांनी तुम्ही निवडून दिलं आणि महाविकास आघाडीच सत्ता आली तर मोठी जबाबदारी मिळेल, असं शरद पवारांनी जाहीरच करून टाकलं आहे.
१९६७ साली मी आमदार होतो, त्यावेळी २७ वर्षांचा होतो. मात्र पहिल्या पाच वर्षात कोणतीही जबाबदारी किंवा मंत्रिपद आपल्याकडे नव्हतं. दुसऱ्या टर्ममध्ये मात्र राज्यमंत्री, तिसऱ्या टर्ममध्ये मंत्री झालो आणि चौथ्या टर्ममध्ये राज्याचा मुख्यमंत्री झालो. आता रोहित पवारही पहिल्या टर्ममध्ये आमदार आहेत, मात्र त्यांच्याकडे कोणतीही जबाबदारी नाही.
यावेळी कर्जमधून तुम्ही रोहित पवारांना निवडून दिलं तर आणि महाविकास आघाडीची सत्ता आली तर त्यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवू, असं आश्वासन शरद पवारांनी आज कर्जतच्या जनतेला दिलं. त्यामुळे रोहित पवारांकडे यावेळी मोठी जबाबदारी असण्याची शक्यता आहे. शिवाय राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे भावी मुख्यमंत्रीही असू शकतात, असे संकेत शरद पवारांच्या आजच्या भाषणातून मिळत आहेत.
