तुम्हालाही वाढत्या वयाबरोबर तुमची स्मरणशक्ती टिकवून ठेवायची असेल, तर एक सोपा उपाय असू शकतो आणि तो म्हणजे अंडे. अलीकडेच, कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटी सॅन डिएगोच्या संशोधकांना एका अभ्यासात आढळून आले की, नियमितपणे अंडी खाल्ल्याने प्रौढांची स्मरणशक्ती सुधारण्याची शक्यता जास्त असते. विशेषतः, अंड्याचे सेवन स्त्रियांमध्ये संज्ञानात्मक कार्य सुधारण्यास मदत करू शकते असा खुलासा या अभ्यासात करण्यात आलाय.
अंड्यातील कोलीन, व्हिटॅमिन बी-6, बी-12 आणि फॉलिक ॲसिड यांसारखे पोषक तत्व मेंदूचे आरोग्य राखण्यास मदत करतात. संशोधकांच्या मते, अंडी केवळ मेंदूची कार्यक्षमता वाढवत नाहीत, तर महिलांच्या संज्ञानात्मक आरोग्यासाठी फायदेशीर आणि स्वस्त आणि सुलभ मार्ग देखील आहेत. जाणून घेऊया अधिक माहिती की अभ्यासात काय खुलासा करण्यता आलाय.
अंड्याने वाढेल स्मरणशक्ती
अंडी खाण्याचा फायदे
युसी सॅन डिएगोने केलेल्या अभ्यासात 55 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या 890 प्रौढांचा समावेश होता, त्यात 357 पुरुष आणि 533 महिलांचा समावेश होता. संशोधकांनी चार वर्षे या प्रौढांचे त्यांच्या संज्ञानात्मक कार्यावर अंड्याच्या सेवनाचा परिणाम तपासण्यासाठी निरीक्षण केले. परिणामांवरून असे दिसून आले की ज्या स्त्रियांनी जास्त अंडी खाल्ली त्यांच्या तोंडी शब्द योग्य आणि पटकन बोलण्याची क्षमता तुलनेने कमी होते. याव्यतिरिक्त, या महिलांमध्ये प्राणी, झाडे आणि इतर वस्तूंच्या श्रेणींची नावे ठेवण्याची क्षमतादेखील अधिक होती, तर ज्या महिलांनी कमी किंवा अंडी खाल्ली नाहीत त्यांच्यामध्ये ही क्षमता कमी दिसून आली.
पुरूषांवर मात्र कमी प्रभाव
अंड्यामुळे महिलांना मिळतो फायदा
जरी अभ्यासात असे आढळून आले की अंड्यांच्या सेवनाने पुरुषांच्या संज्ञानात्मक कार्यावर कोणताही विशेष परिणाम होत नाही, परंतु संशोधकांनी स्पष्ट केले की अंड्याच्या सेवनामुळे कोणत्याही लिंगावर कोणताही हानिकारक प्रभाव पडत नाही. हा शोध महत्त्वाचा आहे, कारण वाढत्या वयानुसार मेंदूतील बदल आणि स्मरणशक्ती कमी होणे ही एक सामान्य समस्या बनली आहे, ज्याला लोक गांभीर्याने घेतात. तर महिलांमध्ये स्मरणशक्ती कमी होण्याचं प्रमाणही अधिक असल्याचे दिसून येते. त्यामुळे अंडी खाणे फायदेशीर ठरू शकते.
रोज अंडी खाण्याचे फायदे
संशोधकांनी असेही सांगितले की, अंडी केवळ मेंदूसाठीच फायदेशीर नसतात, तर महिलांच्या हाडांच्या आरोग्यासाठीही ते फायदेशीर ठरू शकतात. अंड्यांमध्ये उच्च दर्जाचे प्रथिने, व्हिटॅमिन बी 12, फॉस्फरस आणि सेलेनियमदेखील असतात, जे शरीराच्या विविध कार्यांमध्ये सुधारणा करण्यास मदत करतात. व्हिटॅमिन ए, बी12 आणि सेलेनियम रोगप्रतिकारक शक्ती मजबूत ठेवण्यासाठी महत्वाचे आहेत.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.
