Explore

Search

April 12, 2025 8:02 pm

IAS Coaching
लेटेस्ट न्यूज़

Health News : तरुणांमध्ये केस गळतीचे वाढले प्रमाण

ही आहेत 5 मोठी कारणे

केस गळणे किंवा केस तुटणे हि समस्या जगभरातील कोट्यवधी लोकांना सतावत आहे. केस वाढू लागतात आणि कमकुवत होऊ लागतात, मग सहज गळायला लागतात. त्यातच सकाळी उठल्यावर उशीवर, आंघोळीनंतर बाथरूममध्ये किंवा केस विचारताना कंगव्यात केस दिसतात, तेव्हा टक्कल पडण्याची भीती सुरू होते. यामुळे अनेकांना खूप लाज आणि कमी आत्मविश्वासाला सामोरे जावे लागते.

तर तरुणांना देखील केस गाळणाच्या मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. तर यावेळी हेअर ट्रान्सप्लांट सर्जन डॉक्टर गौरांग कृष्णा यांनी केस गळण्याची 5 सर्वात मोठी कारणे कोणती आहेत हि सांगितलेली आहे आणि या समस्येपासून सुटका कशी मिळवावी. चला तर मग जाणून घेऊयात.

केस गळण्याची ५ मोठी कारणे

तणाव

जास्त ताण तणाव आपल्या आरोग्यावर अनेक प्रकारे परिणाम करू शकतो. डॉ. गौरांग कृष्णा यांच्यानुसार ताण तणावामुळे शरीरातील कोर्टिसोलची पातळी वाढते ज्याचा परिणाम केसांच्या फोलिकल्सवर होतो.आणि मोठ्या प्रमाणावर केस गळण्यास सुरुवात होते.

निरोगी आहार न खाणे

शरीरात अनेक पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे केसगळती वाढते. केसांचे आरोग्य राखण्यासाठी अनेक पोषक घटक महत्त्वाची भूमिका बजावतात. म्हणून योग्य आहार न घेतल्याने केस गाळण्याच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यातच तरुणवर्ग हा जास्त करून बाहेरील फास्ट फूड खात असल्याने शरीरात प्रोटीनची कमतरता भासू लागली आहे त्यातच कामांचा तणाव वाढत आहे. त्यामुळे हे प्रकार तुमच्या शरीरावर परिणाम करतात. अशाने तुमची केस गळण्याची समस्या निर्माण होते.

अधिक प्रमाणत कोंडा होणे

हिवाळा सुरू झाला की सगळ्यात पहिले डोक्याची त्वचा कोरडी पडायला सुरुवात होते आणि डोक्यातला कोंडा वाढत जातो. कोंडा वाढला की केस गळायला सुरुवात होते. त्वचेतलं नॅचरल मॉईश्चरायजर कमी झाल्यामुळे केस कोरडे पडू लागतात.

धूम्रपान केल्याने केस गळतात

धूम्रपानामध्ये निकोटीन असते आणि धूम्रपानानंतर कार्बन मोनॉक्साइड बाहेर पडतो; ज्याचा केस आणि हेअर फॉलिकलच्या पेशींवरही दुष्परिणाम होतो. त्यामुळे केस गळतात. शरीरातील इस्ट्रोजन पातळी कमी होते. परिणामत: केसांच्या वाढीसाठी आवश्यक असलेल्या इस्ट्रोजनची कमतरता निर्माण झाल्यामुळे केस गळतात.

दैनंदिन दिनचर्या

तुमच्या रोजच्या दिनचर्येत तुम्ही पुरेशी झोप न घेणे. नियमित व्यायाम न करणे तसेच तुम्ही काम करताना किती टॅन तणावाखाली येऊन काम करता या सगळ्याचा परिणाम तुमच्या शरीरावर आणि केसांवर होत असतो. म्हणून अश्या सवयी केस गळण्याचे कारण बनू शकते. तर यावेळी डॉ. डॉ. गौरांग कृष्णा यांच्या म्हणण्यानुसार या सर्व गोष्टी लक्षात घेऊन तुम्ही तुमचं आहार, तसेच दैनंदिन दिनचर्येत बदल करून शरीराचे आरोग्य नीट ठेऊन केसांचे आरोग्य सुद्धा नीट ठेऊ शकता त्यामुळे केस गळण्याच्या समस्या कमी होऊ शकतात.

Rayat Darpan
Author: Rayat Darpan

Leave a Comment

Live Tv
Advertisement
लाइव क्रिकेट स्कोर
Infoverse Academy