महत्त्वाचं कारण आलं समोर
मुंबई : मराठी टेलिव्हिजनवरील आई कुठे काय करते ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. मालिकेचा शेवटचा एपिसोड देखील शुट झाला आहे. मालिकेतील आईने आता टेलिव्हिजनवरून कायमचा ब्रेक घेतला आहे. अरुंधतीनंतर आता घरोघरी मातीच्या चुली या मालिकेतील एक अभिनेत्री देखील ब्रेकवर जाणार आहे. अभिनेत्रीने नुकतेच काही फोटो शेअर केलेत त्यावरून ही माहिती समोर येत आहे.
घरोघरी मातीच्या चुली ही मालिका देखील मराठी टेलिव्हिजनवर सध्या सर्वाधिक पाहिल्या जाणाऱ्या मालिकांपैकी एक मालिका आहे. टीआरपीच्या शर्यतीतीही ही मालिका पहिल्या पाचात असते. घरोघरी घडणाऱ्या प्रत्येक कुटुंबाची एक कथा पण त्याला थोडा ट्विस्ट देऊन ती दाखवली जात आहे.
या मालिकेत अभिनेत्री जानकी आणि ऋषिकेश ही प्रमुख पात्र आहेत. अभिनेत्री रेश्मा शिंदे आणि अभिनेता सुमीत पुसावळे यांनी या प्रमुख भुमिका साकारल्या आहेत. अभिनेत्री रेश्मा शिंदेची स्टार प्रवाहवरील प्रमुख नायिका म्हणून ही दुसरी मालिका आहे. याआधी ती रंग माझा वेगळा या मालिकेतून प्रक्षकांच्या भेटीला आली होती. रंग माझा वेगळा या मालिकेनंतर तिची घरोघरी मातीच्या चुली ही मालिका देखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे.
घरोघरी मातीच्या चुली या मालिकेतून एक अभिनेत्री ब्रेक घेणार आहे ती दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री रेश्मा शिंदे ही आहे. रेश्मा शिंदे मालिकेतून काही दिवसांचा ब्रेक घेणार आहे अशी माहिती समोर आली आहे. रेश्मी नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे ज्यातून असा अंदाज लावला जात आहे.
रेश्माने शेअर केलेली पोस्ट ही तिच्या लग्नाची आहे. रेश्माचं लग्न ठरलं असून ती लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. रेश्माचं केळवण सुरू झालं आहे. रंग माझा वेगळा या मालिकेच्या टीमने रेश्माचं पहिलं केळवण केलं आहे. रेश्माने माझं केळवण असं म्हणत फोटो शेअर केलेत.
अभिनेत्री रेश्मा शिंदे लग्न करणार म्हटल्यावर ती काही दिवसांच्या रजेवर जाणार आहे. याचाच अर्थ ती मालिकेतून काही ब्रेक घेण्याची शक्यता आहे. पुढील काही दिवसात घरोघरी मातीच्या चुली या मालिकेतून जानकी वहिनी काही दिवस दिसल्या नाहीत तर समजून जा की अभिनेत्री रेश्मा शिंदे हिने तिच्या लग्नासाठी काही दिवसांचा ब्रेक घेतला आहे.
