ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया यांच्यात बॉर्डर गावसकर ट्रॉफीतील पहिला सामना हा 22 नोव्हेंबरपासून पर्थ येथे खेळवण्यात येणार आहे. पॅट कमिन्स सलामीच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचं नेतृत्व करणार आहे. तर रोहित शर्मा याच्याकडे भारतीय संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. मात्र रोहित शर्मा पहिल्या कसोटी सामन्यात कौटुंबिक कारणामुळे उपस्थित नसणार आहे. अशात जसप्रीत बुमराह पहिल्या सामन्यात भारतीय संघाचं नेतृत्व करणार आहे. या सामन्याला अवघे काही तास शिल्लक असताना टीम इंडियाच्या गोटातून मोठी बातमी समोर आली आहे.
रोहितची पत्नी रितीका हीने 15 नोव्हेंबरला मुलाला जन्म दिला. रोहित-रितीका यांना पुत्ररत्नाचा लाभ झाला. त्यामुळे रोहित टीम इंडियासोबत ऑस्ट्रेलियावर दौऱ्यासाठी सोबत गेला नाही. तसेच मुलाच्या जन्मानंतर आणखी काही दिवस कुटुंबासोबत राहणार असल्याने पहिल्या सामन्यात उपलब्ध राहणार नसल्याचं रोहितने बीसीसीआयला सांगितल. त्यानंतर आता रोहित टीम इंडियासह केव्हा जोडला जाणार? याबाबतची माहिती समोर आली आहे.
रोहित शर्माची एन्ट्री केव्हा?
रोहित शर्मा ऑस्ट्रेलियाच्या दिशेने निघण्यासाठी सज्ज झाला आहे. क्रिकबझच्या रिपोर्ट्नुसार, रोहित 24 नोव्हेंबरला पर्थत कसोटीतील तिसऱ्या दिवशी टीम इंडियासह जोडला जाऊ शकतो. तर रोहित सलामीच्या सामन्याआधीही टीमसोबत जोडला जाऊ शकतो, असंही काही मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटलं आहे.
दरम्यान रोहित टीमसोबत जोडल्यानंतर संघाची ताकद निश्चितच वाढेल, यात काहीच शंका नाही. मात्र त्यानंतर रोहितसमोर टीम इंडियाला या मालिकेत आपल्या नेतृत्वात विजयी करण्याचं आव्हान असणार आहे.
रोहितची लवकरच टीम इंडियाच एन्ट्री!
बॉर्डर गावसकर ट्रॉफीसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार) जसप्रीत बुमराह (पहिल्या कसोटीसाठी कर्णधार), यशस्वी जयस्वाल, अभिमन्यु ईश्वरन, देवदत्त पडिक्कल, शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत (विकेटकीपर), सर्फराज खान, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, आकाश दीप, प्रसिद्ध कृष्णा, हर्षित राणा, नीतीश कुमार रेड्डी आणि वॉशिंगटन सुंदर.
