Explore

Search

April 5, 2025 1:02 am

IAS Coaching
लेटेस्ट न्यूज़

IPL 2025 : आयपीएल 18 व्या मोसमाची तारीख जाहीर

नवी दिल्ली : एका बाजूला टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर गावसकर ट्रॉफी कसोटी मालिकेला सुरुवात झाली आहे. तर दुसऱ्या बाजूला क्रिकेट चाहत्यांना आयपीएल 2025 मेगा ऑक्शनचे वेध लागले आहेत. मेगा ऑक्शन यंदा सौदी अरेबियातील जेद्दाह येथे 23 आणि 24 नोव्हेंबरला पार पडणार आहे. त्याआधी एक मोठी बातमी समोर आली आहे. मेगा ऑक्शनआधी आयपीएलच्या 18 व्या मोसमाला केव्हापासून सुरुवात होणार? यााबबत मोठी अपडेट समोर आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आयपीएलच्या आगामी हंगामाला 14 मार्चपासून सुरुवात होणार आहे. तर 25 मे ला अंतिम सामना खेळवण्यात येणार आहे. अर्थात चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलनंतर अवघ्या काही दिवसांनी आयपीएलच्या 18 व्या मोसमाचा थरार रंगणार आहे. नियोजित वेळापत्रकानुसार, चॅम्पियन्स ट्रॉफीतील महाअंतिम सामना हा 9 मार्च रोजी खेळवण्यात येणार आहे.

3 मोसमाच्या तारखा जाहीर

ईएसपीएन क्रिकइन्फोच्या रिपोर्ट्सनुसार, बीसीसीआयने आयपीएलमधील एकूण 10 संघांना मेलद्वारे 18 व्या मोसमाची तारीख सांगितली आहे. इतकंच नाही, तर एकत्रच 3 मोसमांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. मात्र या तारखांबाबत बीसीसीआयने कुठलीच माहिती दिलेली नाही. आयपीएलच्या 19 व्या हंगामाचं आयोजन हे 15 मार्च ते 31 मे दरम्यान होणार आहे. तर विसावं मोसम (IPL 2027) 14 मार्च ते 30 मे दरम्यान पार पडेल, अशी माहिती या रिपोर्टमध्ये देण्यात आली आहे.

चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर टी 20 चा थरार

आगामी आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेनंतर आयपीएलच्या 18 व्या मोसमाला सुरुवात होणार आहे. पाकिस्तानमध्ये 19 फेब्रुवारी ते 9 मार्च दरम्यान चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलच्या 4 दिवसांनंतर अर्थात 14 मार्चपासून आयपीएलच्या सामन्यांना सुरुवात होईल, असा दावा या रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे.

आयपीएल 2025 मेगा ऑक्शन

दरम्यान अद्याप या 18 व्या मोसमाला सुरुवात होण्यासाठी काही महिने आहेत. मात्र त्याआधी सर्वांचं लक्ष मेगा ऑक्शनकडे आहे. मेगा ऑक्शनसाठी 1 हजार 574 खेळाडूंनी नाव नोंदवली होती. त्यापैकी फक्त 574 खेळाडूंची निवड करण्यात आली. तर 1 हजार खेळाडूंची नावं वगळण्यात आली. त्यामुळे आता 574 खेळाडूंमधून फक्त 204 खेळाडूंचीच ऑक्शमधून निवड केली जाणार आहे. त्यामुळे आता कोणता खेळाडू सर्वात महागडा ठरणार? तसेच कोणते खेळाडू रग्गड कमाई करतात? याकडे साऱ्यांचं लक्ष असणार आहे.

Rayat Darpan
Author: Rayat Darpan

Leave a Comment

Live Tv
Advertisement
लाइव क्रिकेट स्कोर
Infoverse Academy