सातारा : मारामारी सह आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी सात जणांविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 20 रोजी संध्याकाळी सहा वाजताच्या सुमारास विठोबाचा नळ ते मंगळवार तळे जाणाऱ्या रस्त्यावर एकमेकांशी लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याप्रकरणी वसंत बबनराव लेवे, निलेश वसंत लेवे, सतीश बबनराव लेवे सर्व रा. चिमणपुरा पेठ, सातारा तसेच संजय दत्तात्रय लेवे रा. शाहूपुरी सातारा, धीरज जयसिंग ठाणे रा. चिमणपुरा पेठ सातारा, साद अय्याज बागवान रा. शनिवार पेठ सातारा, योगेश उर्फ बॉबी भीमराव देवकर रा. शाहूपुरी सातारा यांच्या विरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक ढेरे करीत आहेत.
