सातारा : एकाच्या खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी तीन जणांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 19 रोजी रात्री साडेआठ ते नऊ वाजण्याच्या दरम्यान स्वप्निल सतीश दबडे रा. केसरकर पेठ, सातारा यांच्यावर धारदार कोयत्याने वार करून त्यांच्या खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी आकाश शनी कांबळे, शौर्य सुनील कांबळे, शूर सुनील कांबळे सर्व रा. दुर्गा पेठ, तोफखाना, सातारा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक केणेकर करीत आहेत.
