सातारा : एकमेकांमध्ये पोलीस कर्मचारी समोर असताना मारामारी करून आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी जमावावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 20 रोजी संध्याकाळी पावणे सहा वाजण्याच्या सुमारास गोजेगाव, ता. सातारा येथील मतदान बूथ परिसरात मारामारी करून सार्वजनिक शांतता बिघडवणे तसेच आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी गणेश उर्फ नितीन ताटे रा. तासगाव ता. सातारा, सतीश चव्हाण रा. महागाव ता. सातारा, विनोद अर्जुन घोरपडे, दीपक मोहन घोरपडे, अभिजीत मोहन साळुंखे, किरण घोरपडे, प्रवीण पोपट घोरपडे, हंबीरराव घोरपडे, प्रणय प्रशांत घोरपडे, पवन अशोक शेलार, रोहित मानसिंग घोरपडे, अक्षय भरत घोरपडे, भास्कर एकनाथ घोरपडे सर्व रा. गोजेगाव, ता. सातारा आणि इतर दहा ते सतरा जण यांच्या विरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नेवसे करीत आहेत.
