१० रूपयांची ‘ही’ वस्तू कुंडीत घाला, भरपूर लिंबू येतील
लिंबाचं रोप तुम्ही घरच्याघरी उगवू शकता. यासाठी तुम्हाला काही मेटेनेंस हॅक्स माहित असावे लागतात. तुम्ही पाहिलं असेल की लिंबाचे रोप भरपूर फळं देते. पण काहीवेळा लिंबाचे रोप खूपच सुकते. कोणत्याही फळांना जास्त पोषणाची आवश्यकता असते. मातीत नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियमची गरज असते पण याचं जास्त प्रमाण असल्यास रोपं खराब होऊ शकते. नोएडा सेक्टर २७ मधिल नर्सतील कमलेश कुशवाहा यांनी लिंबाचे रोप उगवण्यासाठी काही सिक्रेट्स सांगितले आहेत.
उगाव. कॉमच्या रिपोर्टनुसार सगळ्यात आधी हे लक्षात घ्यायला हवं की लिंबाचं रोप अशा ठिकाणी ठेवू नका जिथे सुर्यप्रकाश अजिबात येत नाही. जेव्हा या रोपाच्या फांद्या ऊन्हात पिकतात तेव्हा लिंबू रसाळ होतात. जर सावलीत ठेवले तर एक ते दोनपेक्षा जास्त लिंबू येणार नाहीत. सावलीत रोप ठेवल्यामुळे लिंबाची फुलं गळतात ज्यामुळे लिंबू येणं कमी होतं.
कुंडीत जर लिंबाचं रोप लावलं असेल तर एक समस्या असते ती म्हणजे ही फुलं गळू लागतात. हे टाळण्यासाठी सुर्यप्रकाशाबरोबरच पाण्याचीही काळजी घ्यावी लागते जेव्हा कोणत्याही रोपाला फळं येण्याआधी फुलं येऊ लागतात तेव्हा त्यात पाण्याचं प्रमाण योग्य असावं लागतं. जास्त पाणी घातल्यामुळे पानं तुटू शकतात आणि फुलांना योग्य प्रमाणात पोषण मिळत नाही. अशा स्थितीत तुम्ही माती मॉईश्चराईज राहील इतकंच पाणी घालावं.
लिंबाच्या रोपात बोरेक्स पावडर घाला.
बोरेक्स पावडर रोपात घातल्यानं रोपात बोरोनची कमतरता भासत नाही. हे तुम्हाला ऑनलाईन किंवा कोणत्याही जनरल स्टोअरमध्ये मिळेल. याचे ४ तुकडे मातीत घाला. जसजसं पाणी कुंडीत जाईल तसतसं रोपाला पोषण मिळेल. रोपाला लिंबू येत नसतील तर ही ट्रिक उत्तम ठरू शकते.
लिंबाच्या रोपासाठी घरगुती उपाय
१ लिटर पाण्यात थोडं ताक मिसळा हे पाणी मातीत १ ते २ दिवसांनी घाला. माती मुळापासून थोडी सुकल्यानंतर खोदून हे द्रावण मातीत घाला. नंतर छोटं रोप किंवा छोट्या कुंडीत हा उपाय ट्राय करा. जर तुम्ही खूपच छोट्या कुंडीत लिंबाचं रोप लावलं असेल तर तुम्ही थोड्या मोठ्या कुंडीतही लावू शकता.
रिपॉट करताना मुळं थोडी ट्रिम करा. कुंडीत पाणी घालण्याआधी त्या मातीत ऑर्गेनिक खत घाला. यासाठी तुम्ही ऑनलाईन मिळणारं एनपीके खत वापरू शकता. जर तुम्हाला हे खत वापरायचं नसेल तर कम्पोस्ट किंवा शेण खताचा वापर करू शकता.
