Explore

Search

April 8, 2025 2:38 am

IAS Coaching
लेटेस्ट न्यूज़

Bollywood News : ऋषी कपूर यांच्याकडे सगळं काही असताना देखील त्यांच्या दोन इच्छा या अपूर्णच

 

बॉलिवूडचे दिवंगत अभिनेता ऋषी कपूर हे आज आपल्या सगळ्यांसोबत नसले तरी देखील त्यांचे लाखो चाहते आहेत. ऋषी कपूर यांनी 2020 मध्ये अखेरचा श्वास घेतला. कपूर घराण्यातले असले तरी देखील ऋषी कपूर यांनी बॉलिवूडमध्ये स्वत: च्या अभिनयाच्या जोरावर स्थान निर्माण केले. त्यांनी त्यांच्या आयुष्यात सगळं काही मिळालं, लोकप्रियता, पैसा, ओळख आणि कोणत्याही व्यक्तीला जे हवं ते सगळं. मात्र, त्यांच्या दोन इच्छा या अपूर्णच राहिल्या. दरम्यान, त्यांच्या अशा दोन इच्छा कोणत्या होत्या याविषयी त्यांची लेक रिद्धिमा कपूर साहनीनं एका मुलाखतीत सांगितलं.

रिद्धिमा कपूर साहनीनं ‘झूम’ला ही मुलाखत दिली होती. या मुलाखतीत रिद्धिमानं सांगितलं होतं की ‘ऋषी कपूर यांच्या दोन इच्छा होत्या. एक रणबीरचं लग्न आणि दुसरं घर बनवणं. घर आता जवळपास तयार झालं आहे आणि रणबीरचं लग्न देखील झालं. हे आमच्यासाठी कोणत्याही स्वप्नासारखं आहे. माझी खरंच इच्छा आहे की ते आमच्यासोबत असते तर बरं झालं असतं. पण मला वाटतं की देवाची काही वेगळीच इच्छा होती.’

रणबीर आणि आलियाच्या लग्नाविषयी बोलताना रिद्धिमा म्हणाली, माझ्या लग्नात बाबांनी लेकीसाठी खूप मोठं सेलिब्रेशन केलं, तर त्यांच्या मुलानं अगदी विरुद्ध केलं. माझं लग्न खूप ग्रॅंड करण्यात आलं. कारण त्यांना असं करायचं होतं आणि त्यानं ते केलं. जेव्हा रणबीरच्या लग्नाची गोष्ट आली तेव्हा त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की तुम्हाला माहित आहे की आपल्या कुटुंबात एक मोठं लग्न झालं आहे, यावेशी एक मोठं सेलिब्रेशन आहे.

रणबीर आणि आलियाच्या लग्नाविषयी बोलताना रिद्धीमा म्हणाली, तो अगदी साधा मुलगा आहे. रणबीर आणि आलिया दोघेही साधारण व्यक्ती प्रमाणे आहेत. त्यांनी सांगितलं होतं की आम्हाला आमच्या लग्नात फक्त असे लोक हवे आहेत, जे आमच्यासाठी महत्त्वाचे आहेत. असे लोक ज्यांच्यासोबत आम्ही नेहमी संपर्कात राहतो आणि आम्हाला त्यांच्यासोबत खूप चांगला वेळ व्यथित करायचा आहे. त्यांनी जे सांगितलं ते केलं. त्यांनी सगळ्यांसोबत वेळ व्यथित केला. रणबीर आणि आलियानं एप्रिल 2022 मध्ये वांद्रे येथे स्थित असलेल्या घरी लग्न केलं. दरम्यान, त्यांनी आता 6 मजली बंगला बांधला आहे. या बंगल्याची किंमत 250 कोटी आहे. संपूर्ण बंगला तयार झाल्यानंतर कपूर कुटुंब तिथे शिफ्ट होणार आहे.

Rayat Darpan
Author: Rayat Darpan

Leave a Comment

Live Tv
Advertisement
लाइव क्रिकेट स्कोर
Infoverse Academy