Explore

Search

April 13, 2025 12:55 am

IAS Coaching
लेटेस्ट न्यूज़

Satara News : समाजभूषण-दलितमित्र शिवराम माने यांच्या पुण्यतिथी निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

सातारा : महाराष्ट्र शासनाने, ‘‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर दलितमित्र पुरस्कार व कर्मवीर पद्मश्री दादासाहेब गायकवाड समाजभूषण पुरस्कार आणि जिल्हा परिषद साताराने विशेष पुरस्कार प्रदान करून गौरविलेल्या’’ त्याचप्रमाणे पश्‍चिम महाराष्ट्रात शैक्षणिक-सामाजिक अनोख्या उपक्रमांनी नावाजलेल्या, ‘श्री जानाई मळाई शिक्षण संस्थेचे संस्थापक स्व. शिवराम लक्ष्मण माने (गुरूजी) यांच्या तिसर्‍या पुण्यतिथी सोहळयानिमित्त सोमवार दि. 25 नोव्हेंबर 2024 रोजी संस्था कार्यालय माने कॉलनी, देगांवरोड, एम.आय.डी.सी. सातारा येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.’
यामध्ये प्रामुख्याने संस्थेच्या खडतर वाटचालीमध्ये संस्थेच्या, संस्थापकांवर अढळ निष्ठा ठेवून अत्यंत विपरीत परिस्थितीत सेवाकार्य बजावणार्‍या 50 हून अधिक कर्मचार्‍यांना व त्यांच्या आई-वडिलांना मानपत्र व संपूर्ण पोशाख प्रदान करून या वेळी गौरविले जाणार आहे.
अनेक संस्था कर्मचार्‍यांचा वापर करून घेतात. कर्मचार्‍यांची पिळवणूक करून त्यांना राबवून घेतात. परंतू कर्मचार्‍यांबदद्ल कृतज्ञता व्यक्त करण्याचे औदार्य कोणतीही दाखवत नाही. मात्र या संस्थेने कर्मचार्‍यांसह त्यांच्या आई-वडिलांच्याबदद्ल कृतज्ञता व्यक्त करण्याचा आगळावेगळा आणि संपूर्ण महाराष्ट्रातील संस्थांना दिशादर्शक ठरेल असा सोहळा आयोजित केला आहे. या सोहळयाबदद्ल सर्वच क्षेत्रातील मान्यवरांनी कौतुक केले असून, या सोहळयाबदद्ल सर्व समाजात औत्सुकता निर्माण झाली आहे.
त्याचप्रमाणे याचवेळी, ‘संस्थेच्या शिवकला दिनदर्शिका प्रकाशन सोहळा’ संस्थेने आयोजित केलेल्या ‘आंतरशालेय ‘‘शिवकला चषक’’ सुंदर किल्ले सजावट स्पर्धेचा बक्षिस वितरण सोहळा’, त्याचप्रमाणे ‘संस्थेच्या ‘‘एक मूल, एक मूठ धान्य’’ उपक्रमातून विद्यार्थ्यांनी संकलित केलेल्या 2 टनाहून अधिक अन्नधान्याचा, त्याचप्रमाणे 500 हून अधिक कपडयांचा वितरण सोहळा’, संस्थेचे हितचिंतक मार्गदर्शक कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष ना. महेशदादा शिंदे यांच्या शुभहस्ते, माजी आमदार आनंदराव पाटील (नाना) यांच्या अध्यक्षतेखाली आमदार महेशदादा यांच्या सुविद्य पत्नी मा. डॉ. सौ. प्रियाताई शिंदे, भगिनी मा. डॉ. सौ. अरूणाताई बर्गे यांच्या प्रमुख उपस्थितीत मा. रवि साळुंखे, मा. संदिपभाऊ शिंदे, मा. वसंतराव पाटील यांच्या उपस्थितीत संस्था कार्यालयात संपन्न होणार आहे.
त्याचप्रमाणे स्व. माने गुरूजींच्या अर्धाकृती पंचधातूच्या पुतळयाची सवाद्य मिरवणूक देगांव फाटा ते संस्था कार्यालयापर्यंत काढण्यात येणार आहे.
या कार्यक्रमासाठी संस्थेचे सर्व पदाधिकारी हितचिंतक, संस्थेच्या सर्व शाखांचे कर्मचारी, विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ मोठया संख्येत उपस्थित राहणार आहेत. या सर्व संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन संस्थेच्या सातारा शाखेतील पालकांनी केले असून, संस्थेविषयी आस्था असणार्‍या तसेच स्वर्गीय गुरूजींच्या स्नेहींनी मोठया संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन अमोल काटे, शामराव पवार, दादा जाधव, सौ. निलम खामकर सौ. सुनिता शिंदे, सौ. काजल जगताप, सौ. नम्रता कुडाळकर, सौ. अंकिता चव्हाण, सुखदेव शिंदे, अमोल साळुंखे, आनंदा दानवले या कमिटी सदस्यांसह संस्थेच्या सांस्कृतिक विभागप्रमुख कु. प्रतिभा जाधव यांनी निवेदनाद्वारे केले आहे.

Rayat Darpan
Author: Rayat Darpan

Leave a Comment

Live Tv
Advertisement
लाइव क्रिकेट स्कोर
Infoverse Academy