Explore

Search

April 8, 2025 1:44 pm

IAS Coaching
लेटेस्ट न्यूज़

Mehkar Crime News : मेहकरमध्ये दोन गटांत तणाव

गाड्यांची जाळपोळ, दगडफेकीनंतर पोलीस आक्रमक

बुलढाणा : जिल्ह्यातील मेहकर शहरात तणावर निर्माण झाला आहे. राज्यातील विधानसभा निकालाची मतमोजणी २३ नोव्हेंबरला झाली. त्यामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार सिद्धार्थ खरात विजयी झाले. त्यानंतर २४ नोव्हेंबर रोजी रात्री दोन समुदायात दंगल झाली. सहा गाड्या पेटवण्यात आल्या. दगडफेकही झाली. यामुळे पोलिसांना जमाव पांगवण्यासाठी बळाचा वापर करावा लागला. या प्रकारानंतर पोलीस आक्रमक झाले आहे.
23 आरोपींना अटक
मेहकरमधील माळीपेठ भागासह इतर काही भागांमध्ये रविवारी रात्री वाहने पेटवून दिली होती. तसेच मारहाणीच्या घटनाही घडलेल्या होत्या. दोन्ही गटांकडून दगडफेक करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी या भागांत बंदोबस्त वाढवला. संचारबंदी लागू केली. मेहकर शहराच्या सर्व सीमा बंद केल्या. या दंगली प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 23 आरोपींना अटक केली आहे. त्यांची चौकशी केली जात आहे. तसेच इतर दंगलखोरांचा शोध घेतला जात आहे. सध्या शहरात तणावपूर्ण शांतता आहे.
Rayat Darpan
Author: Rayat Darpan

Leave a Comment

Live Tv
Advertisement
लाइव क्रिकेट स्कोर
Infoverse Academy