Explore

Search

April 8, 2025 1:46 pm

IAS Coaching
लेटेस्ट न्यूज़

Satara News : म.फुले स्मृतिदिनापासून डॉ.आंबेडकर महापरिनिर्वाण दिनापर्यंत व्याख्यानमालेचे आयोजन

सातारा : संबोधी प्रतिष्ठानतर्फे येथील नगर वाचनालयाच्या पाठक हॉलमध्ये महात्मा ज्योतिबा फुले  यांच्या (दि.२९ रोजी) स्मृतिदिनापासून दररोज सायंकाळी ६ वा. थोरांच्या स्मृती व्याख्यानमाला सुरू होत असून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या (६ डिसेंबर) महापरिनिर्वाणपर्यंत चालणार आहेत.

गुरुवार दि.२८ रोजी म.फुले स्मृतिदिनानिमित्त, “भारतीय राष्ट्रवाद व संविधान” या विषयावर ज्येष्ट विचारवंत  किशोर बेडकिहाळ यांचे व्याख्यान होणार आहे. शुक्रवार दि.२९ रोजी डॉ.नितीश नवसागरे यांचे, “एक देश, एक निवडणूक व संविधान” या विषयावर व्याख्यान होणार आहे. शनिवार दि.३० रोजी, “मूलभूत हक्क व संविधान” या विषयावर डॉ. श्रीरंजन आवटे यांचे व्याख्यान होणार आहे. रविवार दि.१ डिसेंबर रोजी सकाळी ११ वा.मातोश्री भीमाबाई आंबेडकर पुरस्कार मंगल खिवसरा यांना डॉ.राजेंद्र मोरे यांच्या प्रदान सोहळा होणार आहे.

मंगळवार दि. ३ डिसेंबर रोजी, “राष्ट्रवाद, अल्पसंख्याक व संविधान” या विषयावर अन्वर राजन यांचे व्याख्यान होणार आहे. बुधवार दि.४ रोजी, “संविधान दुरुस्ती व न्यायव्यवस्था” या विषयावर डॉ.शिवाजीराव पाटील यांचे व्याख्यान होणार आहे. गुरुवार दि.५ रोजी ,”भारतीय संघराज्याची वाटचाल व संविधान” या विषयावर डॉ.अशोक चौसाळकर यांचे व्याख्यान होणार आहे. शुक्रवार दि.६ रोजी महापरिनिर्वाण दिनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादनाने सांगता होणार आहे. तेव्हा सदरच्या व्याख्यानांचा लाभ समाजातील विविध घटकांनी घ्यावा. असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

याकामी, अध्यक्ष दिनकर झिंब्रे, उपाध्यक्ष रमेश इंजे, कार्यवाह ऍड.हौसेराव धुमाळ, पदाधिकारी व विश्वस्त अथक असे परिश्रम घेत आहेत.

Rayat Darpan
Author: Rayat Darpan

Leave a Comment

Live Tv
Advertisement
लाइव क्रिकेट स्कोर
Infoverse Academy