Explore

Search

April 9, 2025 11:13 am

IAS Coaching
लेटेस्ट न्यूज़

Pune Crime : पुण्यात मोठा दरोडा टाकण्याचा फसला प्लॅन

पोलिसांनी ‘चूहा गँग’च्या आवळल्या मुसक्या

पुणे : पुण्यात गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे, पुण्यात दररोज गुन्हेगारीच्या घटना उघडकीस येत आहेत. यामुळे नागरिकांसोबतचं पोलिसही हैराण झाले आहेत. अशातच आता पुणे शहरातून तडीपार केलेल्या ‘चूहा गँग’ला दरोड्याच्या तयारीत असताना पोलिसांनी अटक केली आहे. आंबेगाव पोलिसांनी ही कारवाई केली आहे. त्यांच्याकडून साहित्यही जप्त करण्यात आले आहे.

या प्रकरणी आंबेगाव पोलिस ठाण्यातील पोलिस अंमलदार धनाजी धोत्रे यांनी तक्रार दिली आहे. त्यावरून तौसिफ जमीर सय्यद उर्फ चुहा (वय २८, रा. संतोषनगर, कात्रज), सुरज राजेंद्र जाधव (वय ३५, रा. करमाळा), मार्कस डेविड इसार दिवशी सुनावणी (वय २९, रा. धानोरी), कुणाल रमेश नाधव (वय २५, रा. वडगाव शेरी आणि अन्य एका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याकडून एक देशी बनावटीचे पिस्तूल, एक जिवंत काडतूस आणि मॅफेड्रॉन (एमडी) हा अमली पदार्थ, कोयता, डिजिटल वजन काटा आदी साहित्य जप्त करण्यात आले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी तौसिफ सय्यद याच्यावर भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. त्यास मकोका विशेष न्यायालयाने पुणे शहरातून दोन वर्षांसाठी हद्दपार केले आहे. त्याच्यावर दंगल घडविणे, दरोडा, जबरी चोरी अशा प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. त्याला २०२० मध्ये ‘एमपीडीए’ कायद्यांतर्गत स्थानबद्धही केले होते. त्यानंतर नोव्हेंबर २०२३ मध्ये दोन वर्षांसाठी शहरातून तडीपार केले होते.

दरम्यान, तौसिफ सय्यद आणि चुहा गँगचे सदस्य दरोड्याच्या तयारीत असल्याची माहिती आंबेगाव पोलिसांना मिळाली. त्यांनी सापळा रचून चौघांना पकडले. त्यांचा एक साथीदार फरारी झाला आहे. आंबेगाव पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक शरद झिने यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सुरेश शिंदे व मोहन कळमकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.

पुण्यात नागरिकांना लुटले

पुणे शहरात एकट्या पादचारी नागरिकांना भावनिक करून त्यांना लुटण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. पुन्हा दोन घटना घडल्या असून, एका ज्येष्ठ महिलेसह दोघांजवळील किंमती ऐवज चोरट्यांनी लांबविला आहे. सिंहगड रस्ता आणि कोंढवा भागात या घटना घडल्या आहेत. याप्रकरणी पर्वती पोलीस ठाण्यात ६२ वर्षीय महिलेने तक्रार दिली आहे. त्यानूसार, अनोळखी चोरट्यांवर गुन्हा दाखल केला आहे. तक्रारदार या गणेशमळा परिसरात राहायला आहेत. शनिवारी दुपारी एकच्या सुमारास सिंहगड रस्त्यावरील नवशा मारुती मंदिर परिसरातून त्या जात होत्या. त्यावेळी दोन चोरटे त्यांच्याजवळ आले. महिलांना मोफत साडी आणि पैशांचे वाटप करण्यात येत असल्याची बतावणी केली. तुमच्याकडील दागिने आणि रोकड काढून पिशवीत ठेवा, असे सांगितले. नंतर चोरट्यांनी महिलेला बोलण्यात गुंतवत त्यांचे लक्ष नसल्याची संधी साधून पिशवीतील दागिने आणि रोकड असा ५५ हजार ३०० रुपयांचा ऐवज चोरुन नेला. पोलीस उपनिरीक्षक पवार तपास करत आहेत.

Rayat Darpan
Author: Rayat Darpan

Leave a Comment

Live Tv
Advertisement
लाइव क्रिकेट स्कोर
Infoverse Academy