मुंबई : बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानला जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी रायपुरमधून फैजान खानला अटक केली होती. पण आता फैजानला वांद्रे न्यायालयातून जामीन मिळाला असल्याची माहिती समोर येत आहे. फैजान खानला 12 व्या कोर्टातून (केसी राजपूत, जेएमएफसी) जामीन मिळाला. यावेळी वकील प्रजापती आणि विराट वर्मा यांनी बाजू मांडली. ज्यामध्ये फैजान खानला 2 तासांच्या चर्चेनंतर जामीन मंजूर करण्यात आला.
अभिनेता शाहरुख खान आणि त्याचा मुलगा आर्यन खान यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या जवानांची माहिती फैजान खानने काढली असल्याचा दावा करण्यात येत आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी ऑनलाइन सर्च करून शाहरुखची सुरक्षा आणि मुलगा आर्यन याबाबत बरीच माहिती गोळा केली होती. आरोपीकडे असलेला दुसरा मोबाईल फोन बारकाईने तपासला असता, त्याची इंटरनेट हिस्ट्री समोर आला.
शाहरुख खानला मिळाली होती धमकी
बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानच्या नावाने 5 नोव्हेंबर रोजी वांद्रे पोलीस स्थानकात शाहरुख खानच्या नावाने धमकीचा फोन आला होता. जर शाहरुखने आम्हाला50 लाख दिले नाही तर त्याला आम्ही जीवे मारु, अशी धमकी देण्यात आली होती. जेव्हा पोलिसांनी धमकी देणाऱ्याचं नाव विचारलं, तेव्हा त्याने माझं नाव हिंदुस्थानी असल्याचं म्हटलं. धमकीच्या कॉलनंतर वांद्रे पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करून शोध सुरू केला. कॉलरचा शोध घेतला असता तो रायपूरचा असल्याचे समोर आले. वांद्रे पोलिसांनी आरोपीला रायपुरमधून अटक केली.
आरोपीकडून आर्यन खानबद्दल मोठा खुलासा
वांद्रे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने ऑनलाइन जस्ट डायलद्वारे वांद्रे पोलिस स्टेशनचा लँडलाइन नंबर मिळवला होता आणि त्यानंतर त्याने धमकीचा कॉल केला होता. वांद्रे पोलिसांच्या तपासात असंही समोर आलं आहे की, आरोपींनी शाहरुखला धमकावण्यासाठी जो मोबाईल वापरला होता, तो मोबाईल आठवडाभरापूर्वी म्हणजेच 30 ऑक्टोबर रोजी खरेदी केला होता.
वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर शाहरुख खान शेवटचा डंकी सिनेमात दिसला होता. तो आता लवकरच किंग सिनेमात त्याची मुलगी सुहानासोबत दिसणार आहे. पुढील वर्षी हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.
