टोमॅटोत ३ पदार्थ मिसळून चटणी करा
टोमॅटोची चटणी स्वादीष्ट असण्याबरोबरच पोषणानं परीपूर्ण असते. याची चव लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडते. वातावरणानुसार तुम्ही चटणीची निवड करू शकता. टोमॅटोची चटणी तुम्ही अनेक दिवसांसाठी एकदाच बनवून ठेवू शकता. हिवाळ्याच्या वातावरणात टोमॅटोच्या चटणीत आलं, लसूण, तीळ यांसारखे शरीर गरम ठेवणारे पदार्थ घालून चटणी अधिक पौष्टीक बनवू शकता.
ही चटणी दक्षिण भारतीय पदार्थांमध्ये लोकप्रिय आहे. ही चटणी तुम्ही इडली, डोसा किंवा अन्य नाश्त्याच्या पदार्थांबरोबर खाऊ शकता. टोमॅटोची चटणी बनवणं खूप सोपं आहे ही चटणी तुम्ही घरीही बनवू शकता. टोमॅटोची चटणी स्नॅक्सच्या स्वरूपात खाल्ली जाते आणि चविष्ट लागते.
टोमॅटोची चटणी करण्यासाठी लागणारं साहित्य
१) टोमॅटो – ४ ते ५
२) तीळ- अर्धा कप
३) लसणाच्या कळ्या- ४ ते ५
४) आलं – १ इंच
५) हिरवी मिरची – २
६) जीरं- अर्धा चमचा
७) हिंग- अर्धा चमचा
८) मीठ- चवीनुसार
९) लिंबाचा रस- चवीनुसार
१०) पाणी – गरजेनुसार
टोमॅटोची चटणी कशी करावी
सर्व साहित्य तयार करून घ्या. आधी टोमॅटो स्वच्छ धुवून तुकड्यांमध्ये कापून घ्या. त्यात लसूण, आलं वाटून तसंच हिरवी मिरची बारीक करून घाला. एका कढईत तीळ हलके भाजून घ्या. सर्व साहित्य एकत्र करून मिक्सरमध्ये घाला.
भाजलेले तिळ, टोमॅटो, लसूण, आलं, हिरवी मिरची, जीरं, हिंग, मीठ, थोडं पाणी हे साहित्य मिक्सरमध्ये वाटून घ्या. मिक्सरमध्ये याची पातळ पेस्ट तयार करा नंतर यात आवडीनुसार साखर घाला. तयार पेस्टमध्ये लिंबाचा रस घालून व्यवस्थित मिसळा.
ही चटणी तुम्ही दुपारचे जेवण, रात्रीच्या जेवणाला खाऊ शकता किंवा इडली, डोसा, उपमा, दही या पदार्थांबरोबर खाऊ शकता. ही चटणी तुम्ही सॅण्डविच किंवा पावभाजीमध्येही घालू शकता. जर तुम्हाला तिखट खायला खूपच आवडत असेल तर तुम्ही हिरव्या मिरचीचे प्रमाण वाढवू शकता. जर तुम्हाला जाड चटणी आवडत असेल तर कमी पाणी घाला. ही चटणी फ्रिजमध्ये २ ते ३ दिवस स्टोअर करून ठेवू शकता.
