Explore

Search

April 19, 2025 11:39 am

IAS Coaching
लेटेस्ट न्यूज़

LPG Gas : एलपीजी सिलिंडरच्या दरात पुन्हा वाढ

मुंबई : वर्षाच्या शेवटच्या महिन्याला आज सुरुवात झाली आणि पहिल्याच दिवशी ग्राहकांना एक धक्का बसला आहे. कारण ऑईल मार्केटिंग कंपन्यांनी एलपीजी सिलिंडरच्या दरात पुन्हा वाढ केली आहे. कंपन्यांनी सर्व शहरांमध्ये सुधारित किमती जारी केल्या असून, त्यानुसार 19 किलोचा एलपीजी सिलिंडर आता 18 रुपयांनी महागला आहे. याआधी नोव्हेंबरमध्येही सिलिंडरच्या दरात वाढ करण्यात आली होती. मात्र, 14 किलोच्या घरगुती गॅस सिलिंडरच्या किमती स्थिर आहेत.

1 डिसेंबरपासूनच एलपीजी सिलिंडरच्या किमतीत झालेल्या बदलांवर नजर टाकल्यास, दिल्ली ते मुंबई आणि कोलकाता ते चेन्नई 19 किलोचा व्यावसायिक गॅस सिलेंडरची किंमत वाढली आहे. 1 डिसेंबरला राजधानी दिल्लीत 19 किलो एलपीजी सिलेंडरची किंमत 1818.50 रुपये झाली आहे. यापूर्वी ही किंमत 1802 रुपये एवढी होती. तर नोव्हेंबरपूर्वी ही किंमत 1740 रुपयांपर्यंत होती. त्यामुळे दोन महिन्या किमती तब्बल 78 रुपयांनी वाढली आहे.

मुंबईतील एलपीजी सिलिंडरच्या किमतीवर नजर टाकल्यास 19 किलोच्या सिलेंडरची किंमत 1754 रुपये होती, ती आता 1771 रुपये झाली आहे. देशातील इतर शहारांचा आढावा घेतल्यास व्यावसायिक सिलेंडर (कमर्शियल एलपीजी सिलेंडर) कोलकातामध्ये 1927 रुपयांना झाला असून, महिनाभरापूर्वी म्हणजेच 1 नोव्हेंबरला 1911.50 रुपये एवढी या सिलेंडरची किंमत होती. यासोबतच चेन्नईमध्ये हे सिलेंडर 1964.50 रुपयांना मिळत होतं, ते आता 1980.50 रुपयांना मिळणार आहे.

यापूर्वी 1 नोव्हेंबरलाही 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरातही वाढ करण्यात आली होती. त्यावेळी मुंबईत 19 किलोच्या एलपीजी सिलेंडरची किंमत 1692.50 रुपयांऐवजी 1754 रुपयांपर्यंत वाढली होती. तर दिल्लीत सिलिंडरची किंमत 1740 रुपयांवरून थेट 1802 रुपयांवर पोहोचली होती. कोलकात्यात 1850.50 रुपयांवरून 1911.50 रुपये. याशिवाय चेन्नईमध्ये या सिलेंडरची किंमत 1903 रुपयांवरून 1964 रुपये करण्यात आली आहे.

19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत बऱ्याच दिवसांपासून वाढ होत आहे, मात्र 14 किलोच्या घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. या किमती 1 डिसेंबरलाही स्थिर ठेवण्यात आल्या असून, 1 ऑगस्ट 2024 रोजी झालेल्या दरवाढीनुसार मुंबईत या सिलेंडरची किंमत 802.50 रुपये, दिल्लीत 803 रुपये, कोलकात्यात 829 रुपये आणि चेन्नईमध्ये 818.50 रुपये अशी कायम आहे.

Rayat Darpan
Author: Rayat Darpan

Leave a Comment

Live Tv
Advertisement
लाइव क्रिकेट स्कोर
Infoverse Academy