Explore

Search

April 18, 2025 2:42 am

IAS Coaching
लेटेस्ट न्यूज़

Karad News : विधानसभा निवडणुकीचे निकाल संशयास्पद

कराड : महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकीतील ज्या पद्धतीने निकाल लागले आहेत तो संशयास्पद आणि संभ्रम निर्माण कराणारे आहेत. यासंदर्भात पुणे येथे सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव यांनी आत्मक्लेष आंदोलन केले. या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी कराड येथील स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधी समोर विविध सामाजिक संघटनांच्या वतीने आत्मक्लेश आंदोलन करण्यात आले.

बहुजन क्रांती सेना संस्थापक अध्यक्ष राजू भाई दिवाण, भीम आर्मीचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष जावेदभाई नायकवडी, सामाजिक कार्यकर्ते सलीमभाई पटेल हे आंदोलनात सहभागी झाले होते. या आंदोलनास विविध सामाजिक संघटनांनी पाठिंबा दिला आहे. तसेच प्रमुख पदाधिकार्‍यांनी आंदोलनस्थळी भेट दिली. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी फोन करून आंदोलनास पाठिंबा दिला. तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कराड शहर प्रमुख शशिराज करपे, सामाजिक कार्यकर्ते प्रमोद तोडकर, सतीश तावरे यांच्यासह अनेक संघटना कार्यकर्त्यांनी आंदोलनास पाठिंबा दिला आहे. लोकशाही वाचवा असे आवाहन नागरिकांना केले आहे.

Rayat Darpan
Author: Rayat Darpan

Leave a Comment

Live Tv
Advertisement
लाइव क्रिकेट स्कोर
Infoverse Academy