Explore

Search

April 17, 2025 4:35 am

IAS Coaching
लेटेस्ट न्यूज़

Health News : कढीपत्ता तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर

सांधेदुखीपासून त्वचेपर्यंत अनेक आजारवर  उपयोगी

हिवाळा सुरु झाला असून अनेक ठिकाणी कडक्याची थंडी पडायला लागली आहे. हिवाळ्यात आरोग्याशी संबंधित अनेक आजार डोक वर काढतात. सर्दी, खोकला, फ्लू सारखे आजार अनेकांना होत असतात. लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांची हिवाळ्यात अधिक काळजी घ्यावी लागते. अशात रोजच्या जेवण्यात काही पदार्थांचा समावेश केल्यास त्याचा आपल्या आरोग्याला फायदा मिळतो. हिवाळ्यात खास करुन दररोज 10 रुपयांमध्ये मिळणारी पानं तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतं. आम्ही बोलत आहोत, प्रत्येक किचनमध्ये असलेल्या कढीपत्ताबद्दल…कढीपत्ता फक्त तुमच्या जेवणाची चवच वाढवत नाही तर तुमच्या आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे. त्यात व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, कॅल्शियम, लोह इत्यादी अनेक प्रकारचे पोषक घटक आढळतात.

हिवाळ्यात कढीपत्त्याचे फायदे
इम्युनिटी बूस्टर 

कढीपत्त्यात मुबलक प्रमाणात अँटिऑक्सिडेंट असल्याने त्याचा सेवनाने तुमची प्रतिकारशक्ती मजबूत करण्यास मदत मिळते. सर्दी, खोकला आणि फ्लू यांसारख्या सामान्य हिवाळ्यातील आजारांपासून तुमचं संरक्षण करण्यासाठी हे खूप प्रभावी मानली जाते.

पचन सुधारते

कढीपत्ता पाचक एंजाइम सक्रिय करण्यास मदत करतात, याचा फायदा सेवन केलेले अन्नाचे पचन होण्यास फायदा मिळतो. बद्धकोष्ठता आणि अपचन यांसारख्या समस्यांपासून आराम मिळण्यास मदत मिळते.

केसांसाठी फायदेशीर 

कढीपत्त्यात असलेले पोषक घटक केस मजबूत आणि चमकदार बनवण्यास मदत करतात. केस गळणे कमी होते आणि केसांची वाढ होण्यास मदत मिळते.

त्वचेसाठी फायदेशीर 

कढीपत्ता त्वचा निरोगी ठेवण्यास मदत मिळते. कढीपत्तामधील जीवनसत्त्वे आणि अँटिऑक्सिडंट्स त्वचेचे पोषण करतं आणि मुरुम, डाग, सुरकुत्या कमी करण्यास फायदेशीर ठरतं.

हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर

कढीपत्त्यात असलेले अँटिऑक्सिडंट्स हृदयविकाराचा धोका कमी करण्यास फायदेशीर ठरतं. हे रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी आणि कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यासाठी प्रभावी मानलं जातं.

सांधेदुखी कमी करा 

हिवाळ्यात अनेकांना सांधेदुखीचा त्रास वाढतो. कढीपत्त्यात दाहक-विरोधी गुणधर्म असल्याने सूज कमी करण्यास आणि सांधेदुखीपासून आराम देण्यास मदत मिळते.

कढीपत्त्याचा चहा  

पदार्थांची चव वाढवण्यासोबत तुम्ही कढीपत्त्याचा चहादेखील बनवू शकता. त्यासाठी एका भांड्यात ताजा कढीपत्ता आणि पाणी काही मिनिटांसाठी उकळा. त्यानंतर ते गाळून त्यात तुम्ही मध किंबा लिंबाचा रस मिक्स करु पिऊ शकतो. सर्दी आणि घसादुखीमध्ये हे खूप फायदेशीर हा चहा खूप फायदेशीर मानला जातो.

कढीपत्त्याची चटणी

हिवाळ्यात कढीपत्त्याची चटणी खाल्ल्याने तुमच्या जेवणाची चव तर वाढेलच शिवाय अनेक आरोग्यदायी फायदे मिळू शकतात. कढीपत्ता चांगला धुवून कढईमध्ये तो चांगला भाजून घ्या. यात तुम्ही भाजलेले तीळ, शेंगदाणे, जवस, मीठ, चवीसाठी साखर, तिखट घालून मिक्समधून बारीक करा.

कढीपत्त्याची पावडर 
तुम्ही कढीपत्ता वाळवून पावडर बनवू शकता. ही पावडर तुम्ही तुमच्या जेवणात मिक्स करु शकता किंवा पाण्यात मिसळून पिऊ शकता.
कढीपत्ता तेल

खोबरेल तेलात कढीपत्ता उकळून तेल तयार करा. या तेलाने मसाज केल्याने केस आणि त्वचेसाठी फायदा मिळतो.

Rayat Darpan
Author: Rayat Darpan

Leave a Comment

Live Tv
Advertisement
लाइव क्रिकेट स्कोर
Infoverse Academy