महाराष्ट्र जीवन प्राधिकरण जलव्यवस्थापन कार्यालयाचे आवाहन
सातारा : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे लष्कर पाणी पुरवठा केंद्रामार्फत पुरवठा होणाऱ्या ग्राहकांकडे 5 हजार किंवा त्यापेक्षा जास्त पाणी देयक थबाकी आहेत, अशा सर्व ग्रहाकांनी पाणी देयके 15 डिसेंबर पर्यंत भरावीत, असे आवाहन महाराष्ट्र जीवन प्राधिकरण जलव्यवस्थापन उपविभाग क्र. 1 चे उपविभागीय अभियंता यांनी केले आहे.
थकबाकी भरणार नाहीत अशा ग्राहकांची नळजोडणी बंद करण्याची कार्यवाही 16 डिसेंबर पासून सुरु करण्यात येणार आहे. तसेच अवैधरित्या (प्राधिकरणाची मंजूरी न घेता) नळजोडणी करुन घेतली आहे अशांनी प्राधिकरण कार्यालयात त्वरीत संपर्क साधून आवश्यक कागदपत्रांची पूर्तता व डिपॉझिट भरुन अवैध नळजोडणी वैध करुन घ्यावी, असेही प्राधिकरणाकडून कळविण्यात आले आहे.
