आमदार मनोज घोरपडे यांची ग्वाही
सातारा : सातारा जिल्ह्यामध्ये दिव्यांग बांधवांच्या पुनर्वसनासह त्यांच्या विविध समस्यांसाठी विधानसभेमध्ये निश्चित पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही, कराड उत्तरचे नवनिर्वाचित आमदार मनोज घोरपडे यांनी दिली आहे. सातारा जिल्ह्यात त्यांच्या विविध मागण्यांसाठी प्रशासनाकडे योग्य त्या सूचनांद्वारे पाठपुरावा करण्यात येईल असे त्यांनी स्पष्ट केले.
दिव्यांग प्रेरणा सामाजिक संस्थेच्या वतीने जागतिक अपंग दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमांमध्ये ते बोलत होते.
यावेळी एडवोकेट श्रीकांत पन्हाळे, भाजपचे सातारा जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, डॉ. अरुणाताई बर्गे, माजी नगरसेवक बाळासाहेब खंदारे, दिव्यांग संस्थेचे अध्यक्ष अजय पवार, उपाध्यक्ष शैलेंद्र बोर्डे व जिल्हाध्यक्ष अक्षय बाबर इत्यादी यावेळी उपस्थित होते.
घोरपडे पुढे म्हणाले, सातारा जिल्ह्यातील दिव्यांग बांधव आपल्या जीवनामध्ये अनेक समस्यांचा सामना करतात. तरीसुद्धा दिव्यांग प्रेरणा सामाजिक संस्थेच्या वतीने त्यांच्या पुनर्वसनाचे असलेले प्रयत्न हे कौतुकास्पद आहेत. अपंग बांधवांच्या पुनर्वसनासाठी हे एक उत्तम व्यासपीठ आहे. एक आमदार म्हणून सातारा जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांच्या पुनर्वसनासह यांच्या विविध मागण्यांसाठी जिल्हा प्रशासन व राज्य शासन या दोन्हीकडे आपण निश्चितपणे पाठपुरावा करू. अशी ग्वाही त्यांनी दिली.
सुरुवातीला दिव्यांग प्रेरणा सामाजिक संस्थेच्या वतीने मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी भाजप कराड तालुका अध्यक्ष शंकर शेजवळ, महिला अध्यक्ष सीमा घाडगे, सरचिटणीस भाजप दिव्यांग आघाडी दीपक खडंग, जितेंद्र मोरे, तुकाराम नलावडे, शरद साळुंखे, प्रमोद गायकवाड, अनिल आठवडे, सुनील हजारे, धर्मा चव्हाण, नामदेव इंगळे, सुरेश माने, दिलखुश गायकवाड, आनंदा पोटेकर, आबा लोहार, धर्मेंद्र कांबळे, हरिभाऊ साळुंखे, ताज भाई मुलाणी, पांडुरंग शेलार, संजय प्रकाश, दशरथ लोखंडे, दिलीप गारडे, मारुती माने, सुनंदा ढेप, लतिका जगताप, माधुरी देशमुख, शोभा मोरे, चतुरा कुंभार, सोनाली चव्हाण, प्रज्ञा पवार, शालन लोखंडे, इत्यादी यावेळी उपस्थित होते.
आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले या कार्यक्रमासाठी तांत्रिक कारणामुळे उपलब्ध होऊ शकले नाहीत, त्यांनी दिव्यांग प्रेरणा सामाजिक संस्थेला अपंग दिनाच्या भ्रमणध्वनीवरून शुभेच्छा दिल्या.
