सोनाक्षी सिन्हा हिने यावर्षी २३ जून रोजी झहीर इक्वालसोबत लग्नगाठ बांधली. आता तिने तिच्या लग्नाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. आपल्या यूट्यूब चॅनलवर हा बिहाइंड द सीन व्हिडीओ शेअर करताना सोनाक्षी म्हणाली, तुम्ही पाहिलेल्या लग्राचे व्हिडीओ आणि फोटोंमागील सत्य काही वेगळेच आहे. सोनाक्षीने तिच्या यूट्यूब चॅनलवर लग्नाचा पडद्यामागचा व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये ती फुलांच्या चादरखाली लग्नात उत्तरताना दिसत आहे.
यावेळी सोनाक्षी खूप हसताना दिसत आहे, कारण म्हणजे ती ज्या फ्लॉवर बेडशीटच्या खाली एंट्री घेत होती ती खूपच जड होती आणि ती तिला सांभाळणे कठीण होते. सोनाक्षीच्या मैत्रिणी स्टैंडमधून फ्लॉवर बेड हाताळण्याचा प्रयत्न करत होत्या. सोनाक्षीला फ्लॉवर बेडखाली आणले त्यावेळी ती पडण्याची शक्यता होती आणि सोनाक्षी खूप हसत चादरखालून बाहेर आली. इतक्यात तिची बहीण तिच्या मागे येऊन उभी राहिली. पण, सोनाक्षीचे चांगले फोटो क्लिक करण्यासाठी ते काढून टाकले आणि कसेतरी फ्लॉवर बेडशीट व्यवस्थित करून सोनाक्षीला खोलीबाहेर आणले. सोनाक्षी आता तिच्या आगामी चित्रपट निकिता रॉय आणि द बुक ऑफ डार्कनेसमध्ये झळकणार आहे. याशिवाय संजय लीला भन्साळी यांच्या ‘हिरामंडी’ या सीरिजच्या दुसऱ्या सीझनमध्येही ती बघायला मिळणार आहे.
