Explore

Search

April 17, 2025 4:30 am

IAS Coaching
लेटेस्ट न्यूज़

Pune News : योगी आदित्यनाथ यांच्या सभेत गोंधळ घालत महिला पोलिसास शिवीगाळ

आरोपीचा अटकपूर्व जामीन फेटाळला

 

पुणे : भोसरीतील गावजत्रा मैदान येथे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सभास्थळी बॅरिकेटवरून चढून जाताना रोखले असता गोंधळ घालत कर्तव्यावरील महिला शिपायास शिवीगाळ करणार्याचा अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा न्यायाधीश एस. आर. पहाडे यांनी फेटाळला.

रुतीक लांडगे असे जामीन फेटाळलेल्याचे नाव आहे. याबाबत महिलापोलिस अंमलदाराने भोसरीपोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 17 नोव्हेंबर 2024 रोजी भोसरी येथील गावजत्रा मैदान येथे सायंकाळी पाचच्या सुमारास उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची सभा होती. यावेळी, फिर्यादी त्याठिकाणी कर्तव्य बजावत होत्या. सभास्थळी आलेला आरोपी बॅरिकेटवरून चढून जात असताना फिर्यादी यांनी त्यांना रोखले. यावेळी, त्याने फिर्यादी यांच्या अंगावर धावून जात अश्लील शेरेबाजी करून मनास लज्जा निर्माण होईल असे वक्तव्य केले.

याखेरीज, आरोपीसह त्याच्या अन्य साथीदाराने अश्लील हातवारे करीत काही तरी बोलत जोर जोरात हसून निघून गेल्याचे फिर्यादित नमूद करण्यात आले आहे. गुन्ह्यात अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी लांडगे याच्या वतीने न्यायालयात अर्ज करण्यात आला. त्यास जिल्हा सरकारी वकील प्रमोद बोंबटकर यांनी विरोध केला. आरोपीने सार्वजनिक ठिकाणी मोठ्या जनसमुदाया समोर अश्लील व असभ्य वर्तन केले आहे.

अतिमहत्वाच्या व्यक्तीच्या सभेच्या ठिकाणी सुरक्षेसाठी लावण्यात आलेले बॅरिकेट अनधिकृतपणे ओलांडून् व्यासपीठाच्या दिशेने जात असताना कर्तव्यावरील महिला पोलिस अंमलदाराने रोखण्याचा प्रयत्न केला असता हा गुन्हा घडला आहे. अतिमहत्वाच्या व्यक्तिजवळ अनधिकृतपणे पोहोचून त्याच्या सुरक्षिततेस धोका निर्माण करण्याचा आरोपीचा उद्देश होता अगर कसे याबाबत सविस्तर तपास करायचा असल्याने त्याचा अटकपूर्व जामीन फेटाळण्याची मागणी अॅड. बोंबटकर यांनी केली. न्यायालयाने ती मान्य केली.

Rayat Darpan
Author: Rayat Darpan

Leave a Comment

Live Tv
Advertisement
लाइव क्रिकेट स्कोर
Infoverse Academy