Explore

Search

April 17, 2025 4:29 am

IAS Coaching
लेटेस्ट न्यूज़

Satara News : ‘मान्याचीवाडी’ ठरली देशातील सर्वोत्तम ग्रामपंचायत

राष्ट्रपतींच्या हस्ते होणार गौरव

सातारा : ग्रामविकासामध्ये प्रभावी काम करणाऱ्या ग्रामपंचायतींना भारत सरकारच्या पंचायत राज मंत्रालयाच्यावतीने देशपातळीवर देण्यात येणाऱ्या नानाजी देशमुख सर्वोत्तम ग्रामपंचायतीचा पुरस्कार पाटण तालुक्यातील मान्याचीवाडी ग्रामपंचायतीला जाहीर झाला आहे.
यासह ग्राम ऊर्जा स्वराज विशेष पुरस्काराचीही मान्याचीवाडी मानकरी ठरली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते दिल्ली येथे बुधवारी दि. ११ रोजी या ग्रामपंचायतीला गौरविण्यात येणार आहे.

तब्बल अडीच कोटी रुपये रकमेच्या देशपातळीवरील या डबल धमाक्यामुळे गावकऱ्यांनी एकमेकांना पेढे भरवून आनंद साजरा केला. मान्याचीवाडी ग्रामपंचायतीने ग्रामविकासामध्ये विविध उपक्रम राबवत दिशादर्शक काम केले आहे. भारत सरकारच्या पंचायत राज मंत्रालयाच्यावतीने देण्यात येणाऱ्या ग्राम स्तरावरील विविध पुरस्कारांची घोषणा या विभागाच्यावतीने करण्यात आली.

मान्याचीवाडी ग्रामपंचायतीने ग्रामविकासामध्ये विविध उपक्रम राबवत दिशादर्शक काम केले आहे. भारत सरकारच्या पंचायत राज मंत्रालयाच्यावतीने देण्यात येणाऱ्या ग्राम स्तरावरील विविध पुरस्कारांची घोषणा या विभागाच्यावतीने करण्यात आली.

Rayat Darpan
Author: Rayat Darpan

Leave a Comment

Live Tv
Advertisement
लाइव क्रिकेट स्कोर
Infoverse Academy