Explore

Search

April 7, 2025 1:43 am

IAS Coaching
लेटेस्ट न्यूज़

Satara News : कोळेवाडीचा ‘ईव्हीएम’वर विश्वास नाही!

ढेबेवाडी : इलेक्ट्रिकल व्होटिंग मशिन म्हणजेच ईव्हीएम मशिनवर होणारे मतदान संशयास्पद होत आहे, असे आमचे मत आहे. त्यावर आमचा विश्वास नाही. त्यामुळे आगामी सर्व निवडणुकीत ईव्हीएम नव्हे तर मतपत्रिकेवर ठप्पा मारून (बॅलेट पेपरवर) मतदान घ्यावे, अशी मागणी कोळेवाडी ग्रामस्थांनी केला आहे. तसा ठराव ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेने घेतला आहे.

याबाबत सविस्तर माहिती देताना व कोळेवाडी ग्रामस्थांनी ग्रामसभेत घेतलेल्या ठरावाची प्रत प्रसिद्धीसाठी देताना सांगितले की, भारतात संसदीय लोकशाही आहे व लोकशाहीत निवडणूक आणि मतदान प्रक्रिया ही संवैधानिक प्रक्रिया आहे. यापूर्वी मतपत्रिकेवर मतदान घेतले जात होते. त्यावेळी आताच्या सारखा मतदानात संशयकल्लोळ कधीच झाला नाही.

सध्याचे मतदान, निकाल व त्यावर संशयास्पद मतमतांतरे अशा अनेक बाबी संशयाच्या घेर्‍यात अडकल्याचे दिसत आहे. हे लोकशाहीला मारक आहे. गेल्या काही वषार्ंपासून ईव्हीएमवर मतदान प्रक्रिया सुरु आहे. मात्र अलिकडेच काही तरी बिनसलय व देशभरात इव्हीएमवर मतदान प्रक्रिया संशयाच्या भोवर्‍यात का सापडली आहे? हा प्रश्न आहे. यासाठी खुल्या मनाने व संशयविरहीत मतदान निकोप लोकशाहीसाठी आवश्यक आहे. सर्वांचा मतपत्रिकेवर मतदान या प्रक्रियेवर विश्वास आहे. म्हणून भविष्यात जरी वेळखाऊ प्रक्रिया असली तरीही पूर्वीप्रमाणे मतपत्रीकेद्वारे निवडणुक प्रक्रिया राबवावी, अशी मागणी या ठरावाद्वारे आम्ही केली असल्याचेही ग्रामस्थांनी सांगितले.

ईव्हीएम मशिनवर आम्हीही मतदान केले आहे, पण झालेल्या मतदानात कुछ तो गडबड है असे आमचे ठाम मत आहे. त्यामुळे आमचा ईव्हीएमवरील मतदान पद्धतीवर विश्वास नाही. बॅलेट पेपरवरच मतदान घ्यावे, ही आमची मागणी आहे.

– वसंत भोसले, माजी सरपंच, कोळेवाडी.

Rayat Darpan
Author: Rayat Darpan

Leave a Comment

Live Tv
Advertisement
लाइव क्रिकेट स्कोर
Infoverse Academy