सातारा : सातारा जिल्हयात शैक्षणिक-सामाजिक कार्यात अग्रेसर असणार्या श्री जानाई मळाई शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष निर्मलसिंग जागिरसिंग बन्सल यांचे अल्पश: आजाराने दुख:द निधन झाले. मृत्यु समयी ते 63 वर्षे वयाचे होते.
श्री जानाई मळाई शिक्षण संस्थेच्या जडणघडणीमध्ये, संस्थेच्या वाटचालीमध्ये त्यांचा मोलाचा सहभाग होता. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष समाजभूषण-दलितमित्र शिवराम माने यांच्या निधनानंतर संस्थेची धूरा त्यांनी यशस्वीपणे सांभाळली.
निर्मलसिंग बन्सल यांचे सातार्यातील इतर अनेक शैक्षणिक, सामाजिक, औदयोगिक संस्था, संघटनांशी संबंध होते. या संस्था, संघटनांच्या माध्यमातून त्यांनी सातारा जिल्हयात शैक्षणिक, सामाजिक, औदयोगिक क्षे़त्रात सुध्दा भरीव काम केले.
सातार्यातील शिख समाजाच्या गुरुद्वारा उभारणीमध्ये सुदधा त्यांचा सक्रीय सहभाग होता. त्यांच्यावर बुधवार दि. 11 रोजी स. 11:00 वा कैलास स्मशानभूमी, माहुली या ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, 2 मुली असा परिवार असून राजकीय, सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी भेटून कुटुंबीयांचे सांत्वन केले.
