Explore

Search

April 12, 2025 7:41 pm

IAS Coaching
लेटेस्ट न्यूज़

Satara News : सिव्हिल हॉस्पिटल येथे क्षयरोग मोहिमेचे उद्घाटन

सातारा : दिनांक 7 डिसेंबर रोजी सातारा जिल्हा क्षयरोग केंद्र सिव्हिल हॉस्पिटल कॅम्पस सातारा येथे 100 दिवसीय क्षयरोग मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले.

या उद्घाटन सोहळ्यात जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. युवराज करपे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलीपे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकत्सक डॉ. राहूल देव खाडे, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुनिल चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती.

तसेच या कार्यक्रमासाठी WHO Consultant डॉ. राजाभाऊ येवले, WHO consultant डॉ. सुवर्णा रामटेके तसेच स्टेट टी बी ऑफिस चे वैद्यकिय अधिकारी डॉ. उत्तम कांबळे हेही उपस्थित होते.

निमा चे डॉ. शिंगे, IMA सातारा चे डॉ. तावरे, महालक्ष्मी होमिओपॅथी कॉलेज चे प्रतिनिधी, नर्सिंग कॉलेज चे प्राचार्य, कस्तुरबा, गोडोली नागरी आरोग्य केंद्राचे नर्सेस, डॉ, आशा देखील उपस्थित होते.

सर्व STS, STLS, LT, TBHV आणि KIMS चे वैद्यकिय अधिकारी डॉ. राजगुरु सर हे उपस्थित होते.

मान्यवरांच्या हस्ते दीप्रज्वलनाने आणि डॉ रॉबर्ट कोचस् यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. प्रस्तावना वैद्यकीय अधिकारी डॉ. दिपक कुऱ्हाडे यांनी केली. सूत्रसंचालन वैद्यकीय अधिकारी डॉ. कुऱ्हाडे मॅडम यांनी केले.

मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले आणि टी बी आजाराविषयी जनजागृती करणे गरजेचे आहे तसेच टी बी ला कलंक मानने चुकीचे आहे, असे सांगितले.

डॉ. येवले, डॉ. रामटेके, डॉ. युवराज करपे, डॉ. सुनिल चव्हाण यांनी टी बी आजार आणि त्याची भीषणता तसेच टी बी आजार रोखण्यासाठी करत असलेल्या उपाययोजना बाबतीत महिती दिली. 100 दिवसीय क्षयरोग मोहिमेचे उद्दिष्ट, करावयाचे कार्य, विविध आरोग्य शिबिरे राबविणे, पेशंट चे स्क्रिनिंग करणे, टी बी चे लवकर निदान करून पेशंट ला लवकर उपचाराखाली आणणे, उपचार व्यवस्थित पुर्ण करुन त्यांना cure करणे, मृत्यू दर कमी करणे हे महत्वाचे असल्याचे सांगितले.

याप्रसंगी 2 टी बी पेशंट ना पोषण आहाराचे वाटप करण्यात आले. तसेच 1 टी बी पेशंट ने आपले मनोगत व्यक्त केले आणि 1 टी बी विजेता म्हणजे टी बी चॅम्पियन ने देखील आपले मनोगत व्यक्त केले.

यानंतर डॉ. टकले जिल्हा क्षयरोग अधिकारी यांनी आभार व्यक्त केले. निक्षय वाहनाला मान्यवरांनी हिरवा झेंडा दाखवून मार्गक्रमणास अनुमती दिली.

Rayat Darpan
Author: Rayat Darpan

Leave a Comment

Live Tv
Advertisement
लाइव क्रिकेट स्कोर
Infoverse Academy