सातारा : पर्यावरण रक्षणासाठी असलेला नोबेल पुरस्कार मिळालेल्या डॉ. वांगारी माथाई यांची जीवन कहाणी असलेल्या वृक्षमातेचा संघर्ष या सातारा येथील अनिल दाजी साहेब उर्फ बंडा मोहिते यांनी लिहिलेल्या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ बुधवार दि. 11 डिसेंबर रोजी सातारा येथे आयोजित केला आहे.
पुणे येथील सायन प्रकाशन प्रकाशित केलेल्या वृक्षमातेचा संघर्ष या पुस्तकाचे प्रकाशन सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांच्या हस्ते व विभागीय वनाधिकारी हरिश्चंद्र वाघमोडे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सातारा नगर परिषदेचे मुख्याधिकारी अभिजीत बापट, पर्यावरण तज्ञ डॉ अविनाश पोळ, पर्यावरणवादी कार्यकर्ते सुखदेव भोसले हे उपस्थित राहणार आहेत.
बुधवार दि 11 डिसेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता सातारा येथील दैवज्ञ सांस्कृतीक भवन येथे बुधवार दि 11 डिसेंबर रोजी प्रकाशन समारंभ आयोजित केला आहे. अनिल मोहिते हे सातारा नगर परिषदेतून सेवानिवृत्त झाले आहेत.
