Explore

Search

April 12, 2025 7:55 pm

IAS Coaching
लेटेस्ट न्यूज़

Health News : इसबगोल कोलेस्टेरॉल कमी करण्याचा प्रभावी उपाय

आजकाल चुकीच्या खाण्या-पिण्याच्या सवयी आणि चुकीच्या लाइफस्टाईलमुळे आपण वेगवेगळ्या आजारांचे शिकार होत आहोत. आजकाल कमी वयातच लोकांना हाय कोलेस्ट्रॉलची समस्या होत आहे. जी हार्ट अटॅक आणि स्ट्रोकचं कारण ठरते. तसेच कोलेस्टेरॉलने वेगवेगळ्या हृदयरोगांचा धोकाही वाढला आहे. अशात हेल्दी लाइफस्टाईल फॉलो करणं गरजेचं झालं आहे. जर तुम्हाला कोलेस्टेरॉलची समस्या असेल तर काही नॅचरल उपायांनी देखील ही समस्या दूर केली जाऊ शकते.

इसबगोल करेल मदत

बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी तशा तर अनेक गोष्टी उपयोगी पडतात. मात्र, त्यात इसबगोल एक प्रभावी उपाय मानला जातो. इसबगोल ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. ज्याचा वापर वेगवेगळ्या गोष्टींसाठी केला जातो. इसबगोलच्या मदतीने बॅड कोलेस्टेरॉल शरीरातून बाहेर काढण्यास मदत मिळते.

इसबगोलचे फायदे

इसबगोल हे एक खास तत्व आहे जे आतड्यांमध्ये बॅड कोलेस्टेरॉलअब्जॉर्ब होऊ देत नाही. शरीरात चिकटून बसलेलं कोलेस्टेरॉल विष्ठेच्या माध्यमातून बाहेर निघून जातं. काही रिसर्चमधून समोर आलं आहे की, इसबगोल आपल्या आतड्यांमध्ये एक थर तयार करतं आणि कोलेस्टेरॉल अब्जॉर्ब होऊ देत नाही.

कसं कराल सेवन?

इसबगोल आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतं. मात्र, याचं सेवन योग्य पद्धतीने केलं जाणं महत्वाचं आहे. सामान्यपणे इसबगोल कोमट पाण्यात टाकून सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. ही पद्धतही फायदेशीर आहे. पण जर तुम्ही दह्यासोबत इसबगोलचं सेवन केलं तर उपाय अधिक प्रभावी ठरतो. दह्यामध्ये भरपूर अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट्स असतात. तसेच यात असेही अनेक तत्व असतात जे कोलेस्ट्रॉल कंट्रोल करण्यास मदत करतात. अशात सकाळी ताज्या दह्यात इसबगोल टाकून सेवन करा. काही रिसर्चमधून समोर आलं आहे की, आठवड्यातून दोन ते तीन वेळा इसबगोल दह्यासोबत सेवन केल्यास बॅड कोलेस्टेरॉल कंट्रोल करण्यास मदत मिळते.

काय काळजी घ्याल?

इसबगोल एक घरगुती उपाय आहे. त्यामुळे याचं सेवन करण्याआधी एकदा डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा. जर डॉक्टरांनी तुम्हाला कोलेस्ट्रॉल कंट्रोल करण्यासाठी औषधे दिली असतील तर याचं सेवन लगेच बंद करा. आधी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. तसेच इसबगोलचं जास्त सेवन केल्यास जुलाब, मळमळ, उलटी, पोटदुखी आणि गॅसची समस्या होत असेल तर याचं सेवन लगेच बंद करावं.

(टिप – लेखातील उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. यात लोकमत कोणताही दावा करत नाही. हा उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्यावा.)

Rayat Darpan
Author: Rayat Darpan

Leave a Comment

Live Tv
Advertisement
लाइव क्रिकेट स्कोर
Infoverse Academy