सातारा : सातारा शहरातील पोवई नाका परिसरात उभारण्यात येत असलेल्या लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या स्मारकाच्या कामाची पाहणी माजी मंत्री शंभूराज देसाई यांनी गुरुवारी दुपारी केली. यावेळी पुढील दोन महिन्यात स्मारकाचे काम पूर्ण होईल असा विश्वास त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.
स्वर्गीय लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे स्मारकाचे पोवई नाका परिसरामध्ये चालू आहे या कामाचे सध्या परिस्थिती पाहण्याकरता माजी पालकमंत्री शंभूराज देसाई येथे आले होते. ते यावेळी म्हणाले या स्मारकाचे म्युरल चे काम ज्या व्यक्तीकडे देण्यात आले होते, ती व्यक्ती आजारी असल्यामुळे ते संथ गतीने सुरू आहे. त्यामुळे हे काम दुसऱ्याकडून करण्याच्या सुचना मुख्याधिकारी बापट यांना केल्याचे सांगितले. यामध्ये निधीची कोणतीच अडचण नाही कारण पालकमंत्री असतानाच निधीची तरतूद केली असल्याचे त्यांनी सांगितले. पुढील दोन महिन्यांत या स्मारकाचे पूर्ण काम होईल असे ही त्यांनी सांगितले.
यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलिस प्रमुख समीर शेख, नगरपालिकेचे मुख्याधिकारी अभिजित बापट यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
