मुंबई : चायनीज पकोड्याच्या ग्राईंडरमध्ये शर्ट अडकून एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आलेली आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. कर्मचारी काम करत असताना अचानक त्याचा हात ग्राइंडरमध्ये अडकताना व्हिडिओत दिसून येते. ही घटना थरकाम उडवणारी आहे.
या विषयी अधिक माहिती अशी की, वरळी येथील नरिमन भाट नगर येथे (१९ वर्षीय) सूरज यादव हा तरूण चायनीज पकोड्याच्या मशीनवर काम करत होता. यावेळी अचानक त्याचा हात मशीनच्या ग्राईंडरमध्ये अडकला आणि तो मशीनमध्ये खेचला गेला. यामध्ये दुदैवाने त्याचा मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांच्या मदतीने कर्मचाऱ्याला बाहेर काढण्यात आले. दादर पोलिसांनी फॅक्टरीचा मालक सचिन कोठेकरच्या विरोधात निष्काळजीपणे मृत्यूस कारणीभूत झाल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
