Explore

Search

April 13, 2025 10:25 am

IAS Coaching
लेटेस्ट न्यूज़

Satara News : अल्प व्याजदाराने त्वरित वाहन तारण कर्ज उपलब्ध : अमोल मोहिते

जनता सहकारी बँकेच्या सातारा शाखेतर्फे ‘ किया इलेक्ट्रीक’ गाडीचे वितरण

सातारा : सर्वसामान्यांची बँक असा नावलौकिक असलेल्या जनता सहकारी बँक सातारामध्ये अल्प व्याजदराने त्वरित वाहन कर्ज उपलब्ध आहे. वैयक्तिक व व्यावसायिक
वाहन कर्ज वितरण सुरु असून या योजनेचा लाभ ग्राहकांनी घ्यावा असे आवाहन जनता सहकारी बँक साताराचे चेअरमन अमोल मोहिते यांनी केले. जनता सहकारी बँक लि., साताराचे सभासद जवाहर भोसले यांना ‘किया इलेक्ट्रीक’ गाडीचे वितरण बँकेचे भागधारक पॅनेल प्रमुख व बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे चेअरमन विनोद कुलकर्णी, चेअरमन अमोल मोहिते यांच्या हस्ते समारंभपूर्वक करण्यांत आले. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी बोलताना मोहिते म्हणाले, जिल्ह्याची अर्थवाहीनी व सर्व सामान्यांची बँक असा नावलौकिक असलेली जनता सहकारी बँक सर्व सामान्यांच्या उन्नतीसाठी कटीबध्द आहे. संचालक मंडळाने ठरवलेल्या ध्येय धोरणांनुसार बँकेतील सर्व अधिकारी व सेवकांनी नियोजनबध्द कामकाज केले आहे. थकित कर्ज वसुली कामकाज अत्यंत प्रभावीपणे करून  नोव्हेंबर २०२४ अखेर बँकेचे नेट एन.पी.ए. चे प्रमाण २ टक्क्यापेक्षापण कमी राखले आहे. सातारावासियांनी दाखवलेल्या विश्वासावरच बँकेने प्रगती साधली असून मार्च २०२४ अखेर बँक आर्थिक व तांत्रिक दृष्ट्यादेखील अधिक सक्षम झाली आहे. बँकेच्या सभासदांसाठी कॅश क्रेडीट कर्ज ९ टक्के तर सा. कर्ज तारणी ९.५० टक्के या विशेष  अल्प व्याजदरांच्या कर्ज योजना सुरू केल्या असून त्याचा जास्तीत जास्त सभासदांनी लाभ घ्यावा.
श्री. जवाहर भोसले यांनी बँकेच्या अधिकाऱ्यांनी फक्त तीन तास एवढ्या कमी वेळेत गाडीचे कर्ज तत्परतेने मंजुर केल्याबद्दल सर्व संचालक सदस्य,
अधिकारी व सेवक वर्ग यांना सहकार्याबद्दल धन्यवाद देवून बँकेच्या प्रगतीसाठी शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी बँकेचे भागधारक पॅनेलप्रमुख, जेष्ठ संचालक व बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे चेअरमन विनोद कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी  अनिल जठार, बँकेच्या कर्मचारी संघाचे अध्यक्ष उमेश साठे, प्रशासन अधिकारी महेंद्र पुराणिक, व्यवस्थापक काटकर,  शाखाधिकारी सातारा शाखा निळकंठ सुर्ले, बँकेचे. इतर अधिकारी व सेवक वर्ग उपस्थित होते.

Rayat Darpan
Author: Rayat Darpan

Leave a Comment

Live Tv
Advertisement
लाइव क्रिकेट स्कोर
Infoverse Academy