Explore

Search

April 5, 2025 1:03 am

IAS Coaching
लेटेस्ट न्यूज़

ISRO And ESA : मानवी अवकाश मोहिमेसाठी ‘ISRO-ESA’ मध्ये महत्त्वपूर्ण करार

नवी दिल्ली : भारतीय अंतराळ संशोधन संस्था ISRO ने आंतरराष्ट्रीय भागिदारीमध्ये महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. भविष्यातील मानवी अंतराळ मोहिमेसाठी इस्रो (ISRO) आणि इसा (ESA) यांच्यामध्ये महत्त्वपूर्ण करार झाल्याची माहिती इस्रोने आज (दि.२१) अधिकृत एक्स अकाऊंटवर केलेल्या पोस्टमध्ये दिली आहे.

इस्रोने केलेल्या एक्स पोस्टमध्ये म्हटले आहे की, “इस्रो (Indian Space Research Organisation) आणि ईसा ((European Space Agency) यांनी भविष्यातील अंतराळवीर प्रशिक्षण, मोहिमेची अंमलबजावणी आणि संशोधन प्रयोगांमध्ये एकमेकांना सहकार्य करण्यासाठी एक करार केला आहे”. ज्यामध्ये आगामी अ‍ॅक्सिओम-४ मोहिमेसाठी सहकार्य समाविष्ट आहे. ही भागीदारी भारताच्या मानवी अंतराळ उड्डाण क्षमता आणि जागतिक सहकार्याला चालना देणार असल्याचा विश्वास देखील इस्रोने व्यक्त केला आला आहे.

Rayat Darpan
Author: Rayat Darpan

Leave a Comment

Live Tv
Advertisement
लाइव क्रिकेट स्कोर
Infoverse Academy