Explore

Search

April 5, 2025 1:02 am

IAS Coaching
लेटेस्ट न्यूज़

Cricket News : श्रेयस अय्यरने विजय हजारे ट्रॉफीत झळकावले शतक!

ठोकले 10 षटकार

भारतात विजय हजारे ट्रॉफीचा उत्साह कायम आहे. विजय हजारे ट्रॉफीचे सामने चालू आहे आणि याचा आनंद भारतीय क्रिकेट चाहते घेत आहेत. सध्या मुंबई विरुद्ध कर्नाटका यांच्यामध्ये सामना सुरु आहे. कर्नाटकच्या संघाने नाणेफेक जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मुंबईच्या संघाची कमान भारताचा फलंदाज श्रेयस अय्यरकडे सोपवण्यात आली आहे, तर कर्नाटक संघाची कमान मयंक अग्रवालकडे सोपवली आहे. या मनोरंजक सामन्यांमध्ये मुंबईचा कर्णधार श्रेयस अय्यरने दमदार फलंदाजी केली आहे.

स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी मुंबईचा कर्णधार श्रेयस अय्यरने आपल्या तुफानी फलंदाजीने खळबळ उडवून दिली आहे. अय्यरने कर्नाटकविरुद्ध दमदार फलंदाजी करत अवघ्या ५१ चेंडूत आपले शतक पूर्ण केले. अय्यर ११४ धावांची खेळी खेळल्यानंतर मुंबईसाठी नाबाद राहिला, जिथे त्याने ५५ चेंडूंचा सामना केला आणि पाच चौकार आणि दहा षटकार मारले.

चार महिन्यांपूर्वी भारतीय संघाकडून शेवटचा खेळलेला श्रेयस अय्यर या स्पर्धेकडे आगामी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी ऑडिशन म्हणून पाहत आहे. चार महिन्यांपूर्वी भारतीय संघाकडून शेवटचा खेळलेल्या अय्यरला या स्पर्धेद्वारे आगामी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पुनरागमन करण्याची आशा आहे. अय्यरने या सामन्यात ५५ चेंडूत २०७ च्या उत्कृष्ट स्ट्राईक रेटने ११४ धावांची खेळी केली. त्यांच्याशिवाय आयुष म्हात्रेने ७८ धावांचे, यष्टीरक्षक हार्दिक तामोरने ८४ तर शिवम दुबेने ६३ धावांचे योगदान दिले. या फलंदाजांच्या जोरावर मुंबईने प्रथम खेळताना निर्धारित षटकांत ३८२ धावांची मोठी धावसंख्या उभारली.

कर्नाटकच्या संघाने सुरुवात चांगली केली आहे. १२ ओव्हरचा खेळ झाला आहे, यामध्ये नितीन जोसे याने १३ चेंडूंमध्ये २१ धावा केल्या आहेत. त्यानंतर त्याचा विकेट शिवम दुबेने घेतला. सध्या कर्नाटक संघासाठी कर्णधार मयंक अग्रवाल आणि केवी अनिश फलंदाजी करत आहेत. मयंक अग्रवालने संघासाठी ३९ चेंडूंमध्ये ४० धावा केल्या आहेत अजूनही तो मैदानावर टिकून आहे. तर केवी अनिश तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करत आहे. त्याने १७ चेंडूंमध्ये १२ धावा केल्या आहेत.

Rayat Darpan
Author: Rayat Darpan

Leave a Comment

Live Tv
Advertisement
लाइव क्रिकेट स्कोर
Infoverse Academy