Explore

Search

April 7, 2025 2:01 am

IAS Coaching
लेटेस्ट न्यूज़

Marathi Serial : तारक मेहतामधल्या भिडेची बायको गाजवतेय स्टार प्रवाहची लोकप्रिय मालिका

मुंबई :  तारक मेहता का उल्टा चश्मा या शोने १७ हून अधिक वर्ष प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. आजवर या मालिकेत अनेक वेगवेगळे कलाकार पाहायला मिळाले. तर काही पहिल्या एपिसोड पासून आजतागायत काम करत आहेत. या मालिकेतली प्रत्येक पात्र ही शिक्षकांचे भरपूर मनोरंजन करतात. दररोज यांना टीव्हीवर पाहायला मिळत असल्यामुळे प्रेक्षकांना ती एक प्रकारे घरातलेच वाटतात. या मालिकेत आत्माराम तुकाराम भिडे ही भूमिका अभिनेता मंदार चांदवडकरने साकारली आहे. मंदारने यापूर्वीही अनेक भूमिका केलेल्या पण आत्माराम भिडे ही आता त्याची नवीन ओळख झाली आहे.

मंदार प्रमाणेच त्याची पत्नी सुद्धा सिने इंडस्ट्रीमध्ये कार्यरत आहे. स्टार प्रवाह वर नुकत्याच सुरू झालेल्या लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत आत्माराम भिडेची खरी पत्नी महत्त्वपूर्ण भूमिका साकारते. याबाबत स्टार प्रवाहच्या अधिकृत इंस्टाग्राम वर नुकतीच एक पोस्ट शेअर करण्यात आली. मंदार चांदवडकर च्या पत्नीचे नाव स्नेहल असे आहे. इंस्टाग्राम वर शेअर करण्यात आलेल्या पोस्टमध्ये स्नेहलच्या भूमिकेची ओळख करून देण्यात आली आहे. तोंडावर गोडपण आतून कारस्थानी, पैशांचा हव्यास असणारी पण मोठी कंजूस.

स्नेहलच्या पात्राचे नाव मंजुषा सावंत असे आहे. याबद्दल तिने म्हटले आहे की, नमस्कार मी स्नेहल मंदार चांदवडकर. आणि मी तुम्हाला भेटायला येते मंजू या भूमिकेत. लग्नानंतर होईलच प्रेम या स्टार प्रवाहच्या मालिकेत मी मंजू ही भूमिका साकारते आहे. आमच्या या मालिकेत अनेक कलाकारांच्या वैविध्यपूर्ण भूमिका आहेत. त्यातली मंजू आपल्या कुटुंबासह तिच्या दादाच्या घरी राहत असते. थोडक्यात खूप आंबट गोड तिखट अशी माझी भूमिका आहे त्यामुळे ही मालिका नक्की बघा.

 

लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेबद्दल बोलायचे झाल्यास अभिनेत्री मृणाल दुसानीस ४ वर्षांनी पुन्हा एकदा टीव्हीवर पाहायला मिळते. चार वर्षे अमेरिकेत राहिल्यावर ती पुन्हा एकदा भारतात आली त्यानंतर ती टीव्हीवर कधी पाहायला मिळणार अशी प्रेक्षकांना उत्सुकता होती. अखेर गेल्या महिन्यात तिच्या स्टार प्रवाह वरून परतीचे संकेत मिळाले आणि प्रेक्षकांना फार आनंद झाला. या मालिकेत मृणाल शिवाय ठिपक्यांची रांगोळी फेम अप्पू म्हणजेच अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर , विवेक सांगळे आणि विजय आंदळकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

Rayat Darpan
Author: Rayat Darpan

Leave a Comment

Live Tv
Advertisement
लाइव क्रिकेट स्कोर
Infoverse Academy