सातारा : लिंब, ता. सातारा येथील क्रांतीसूर्य महात्मा जोतिबा फुले प्रतिष्ठानतर्फे भारतीय स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या, विद्येची देवता, ज्ञानज्योती क्रांतिज्योती, सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त बुधवार, दि. 1 रोजीपासून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती प्रतिष्ठानतर्फे देण्यात आली.
प्रतिष्ठानतर्फे दि. 1 ते 3 जानेवारी या कालावधीत विविध समाज प्रबोधन पर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. यामध्ये बुधवार, दि. 1 जानेवारी रोजी सांगलीचे प्रसिध्द व्याख्याते अण्णासाहेब शिंदे यांचे ‘आई बाप माय बाप ’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. गुरुवार, दि. 2 जानेवारी रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार, दि. 3 जानेवारी रोजी सावित्रीबाईंच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक, शालेय विद्यार्थ्यांची भाषणे, यंदाच्या वर्षातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव, प्रतिष्ठान तर्फे सर्वांना शालेय वस्तूंचे वाटप करण्यात येणार आहे. सायंकाळी सहा वाजता भारुडाचा कार्यक्रम आणि सर्वांसाठी महाप्रसाद आयोजित केला आहे. दरम्यान, शनिवार, दि. 5 जानेवारी रोजी माळी समाजाचा राज्यव्यापी वधू वर परिचय मेळावा आयोजित केला आहे. या सर्व कार्यक्रमात सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
