सातारा प्रतिनिधी
सातारा सीए शाखेची नवीन कार्यकारणी नुकतीच जाहीर करण्यात आली.चार्टर्ड अकाउंटंट साठी नवीन उपक्रम व नेतृत्वाची नवी वाटचाल करण्याच्या उद्देशाने सातारा सीए शाखेच्या अध्यक्षपदी सीए मंगेश प्रकाश प्रधान यांची तर उपाध्यक्षपदी सीए जोहेब नासिरहुसैन मुलाणी यांची एकमताने निवड करण्यात आली आहे.
नवीन कार्यकारणी निवडीच्या अनुषंगाने सातारा येथे चार्टर्ड अकाउंटंटची बैठक संपन्न झाली. या बैठकीत एकमताने कार्यकारणी निवडण्यात आली. 2025-29 या कालावधीसाठी ही नवीन कार्यकारि णी निवड करण्यात आली आहे. मोठ्या उत्साहात या निवडी पार पडल्या.
या कार्यकारिणीच्या सचिव पदी सीए सुमित किरण कदम, खजिनदार सीए स्वप्निल अशोक भोसले ,सदस्यपदी सीए तानाजीराव जाधव व निखिल ओसवाल यांची निवड करण्यात आली आहे.
या विशेष प्रसंगी ज्येष्ठ चार्टर्ड अकाउंटंट शामराव गीते, अतुल दोशी, धीरज कसट, सौरभ लाहोटी, विनोद सावंत, रियाज मोमीन ,जयसिंग चव्हाण, जीवन जगताप, रामदास कामठे, सत्यजितराव भोसले, उपस्थित होते.
दरम्यान सीए सातारा शाखेच्या उज्वल भविष्यासाठी कार्यकारी मंडळाला सहकार्य करण्याचे आश्वासन यावेळी उपस्थित चार्टर्डअकाउंटंट यांनी दिले.तर सातारा शाखेच्या भविष्यातील योजनांची रूपरेषा नूतन अध्यक्षांनी सादर केली. व व्यवसायातील नव्या संधी, टेक्नॉलॉजीचा प्रभाव, तसेच कार्यशाळा व सेमिनारच्या आयोजनावर आपण आगामी काळात अध्यक्षपदावरून काम करताना भर देण्याचा निर्धार अध्यक्ष मंगेश प्रधान यांनी यावेळी व्यक्त केला.
