सातारा प्रतिनिधी : जिल्ह्यातील प्राथमिक शाळांचे थकीत वीज बिल न भरल्याने तब्बल १६११ शाळांचे वीज कनेक्शन होणार बंद ? जिल्हा परिषद प्रशासनच्या वतीने तत्काळ कार्यवाही करत परीक्षार्थी विध्यार्ध्यांचे शैक्षणिक नुकसानाला जबाबदार तरी कोण ?
मागील काही वर्षांत तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी शाळांची वीजबिले ग्रामपंचायतींच्या १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून भरण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, या निर्णयाची तात्पुरती अंमलबजावणी झाल्याचे दिसून आले. त्यामुळे शाळांची बिले भरण्याबाबत ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे
सातारा जिल्हा परिषदेच्या शाळांची थकीत वीजबिले शाळांनी भरायची की ग्रामपंचायतींच्या १५ व्या वित्त आयोगातून भरायची या गोंधळात झेडपी शाळांचे तब्बल ५० लाखांहून अधिक वीजबिल थकीत असल्याचे समोर आले आहे. सातारा जिल्ह्यातील १ हजार ६११ शाळांचे मागील काही महिन्यांचे बिल भरले नाही. यावर मार्च महिन्याच्या अखेरपर्यंत वीजबिले न भरल्यास वीज बंद करण्याचा इशारा महावितरण विभागाने दिला आहे.
जिल्हापरिषदांचे घटती विध्यार्धी संख्या ही भौतिक सुविधांचा अभाव व दर्जेदार शिक्षणाच्या बाबतीत होणारी काचराई याला ज्ञानाचा अंधकार म्हणावा का असा प्रश्न साहजिक च पडत आहे .
