Explore

Search

April 7, 2025 2:13 am

IAS Coaching
लेटेस्ट न्यूज़

हसन मुश्रीफ यांनी वाशीमच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी सोडली ?

काही दिवसांपूर्वीच महायुती सरकारने मंत्र्यांना पालकमंत्री पदाची जबाबदारी दिली होती. मंत्री हसन मुश्रीफ यांना वाशीम जिल्ह्य़ाच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली होती. दरम्यान, आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. हसन मुश्रीफ यांनी वाशीम जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी सोडली आहे.

हसन मुश्रीफ हे कोल्हापूर चे आहेत. त्यांना त्यांच्या मतदारसंघात वेळ देता येत नसल्याने त्यांनी ही जबाबदारी सोडल्याचे सांगण्यात येत आहे. महायुती सरकार मध्ये गेल्या काही दिवसांपासून रायगड अणि नाशिकच्या पालकमंत्री पदावरून तिढा सुरू आहे. हा तिढा सुटला नसताना आता वाशीमच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी हसन मुश्रीफ यांनी सोडली आहे, यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.
याबाबत हसन मुश्रीफ यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत चर्चा केली आहे. दुसरीकडे दत्ता भरणे याच्याकडे कोणत्याच जिल्ह्याचे पालकमंत्री पद नाही. यामुळे आता वाशिम जिल्ह्याची जबाबदारी भरणे यांच्याकडे जाणार असल्याची चर्चा सुरू आहे.
कालच राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. तर दुसरीकडे दुसऱ्याच दिवशी हसन मुश्रीफ यांनी पालकमंत्रीपदाची जबाबदारी सोडली आहे. यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

 

Rayat Darpan
Author: Rayat Darpan

Leave a Comment

Live Tv
Advertisement
लाइव क्रिकेट स्कोर
Infoverse Academy