Ravindra Dhangekar Resigns Congress: पुण्यात काँग्रेसला (Pune Congress) शिवसेनेनं अखेर मोठं खिंडार पाडलं आहे. पुण्यातील कसबा पेठचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी काँग्रेसला रामराम ठोकला आहे. आज पत्रकार परिषद घेत रवींद्र धंगेकर यांनी याबाबतची माहिती दिली आहे. रवींद्र धंगेकर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. काँग्रेस सोडताना दु:ख व्यक्त होत असल्याची भावना यावेळी रवींद्र धंगेकर यांनी सांगितले. पक्ष सोडताना दुःख होत आहे. सत्ता असल्याशिवाय काम होत नाहीत. शिंदे आणि सामंत यांना भेटलो. कार्यकर्त्यांसोबत सगळ्याची चर्चा केली. आज प्रवेशाबाबत चर्चा करणार आहे. सायंकाळी 7 वाजता एकनाथ शिंदे यांना भेटणार आहे. आज कार्यकर्त्यांना विचारून निर्णय घेणार आहे. कार्यकर्ते मतदारांचा आदर करूनच प्रवेश करणार आहे, असे रवींद्र धंगेकर म्हणाले आहेत. दरम्यान रवींद्र धंगेकरांना काँग्रेसकडून शहराध्यक्षपदाची ऑफर, तरीही कोणावर नाराज होऊन पक्ष सोडणार? का यावर धंगेकरांनी मा पक्षाचा आभारी आहे, त्यांनी मला भरभरून प्रेम दिलं आहे असं म्हणत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
काँग्रेस सोडण्याचं कारण काय?
मी पहिल्यांदाच काँग्रेस पक्षाचे नेते, पदाधिकारी, कार्य़कर्ते आणि मतदारांचा आभारी आहे. मी त्यांचा कायम आभारी आहे. माझी विचारसरणी मानवतवादी आहे. काँग्रेसने माझ्यासारख्याला त्यांनी विधानपरिषद, लोकसभा अशी उमेदवारी दिली. शेवटी जनता ठरवते कोणाला निवडून द्यायचं नाही, कोणाला नाही? काँग्रेसचे पुण्यातील कार्यकर्ते उत्साही आणि काम करणारे आणि प्रेमळ आहेत. पक्षाचे पदाधिकारी चांगल्याप्रकारे माझ्या पाठी उभे राहिले. निवडणुकीत दोनवेळा उभा राहून माझा पराभव झाला, पण मी कोणाला दोष दिला नाही. काँग्रेस पक्ष सोडणे सोपे नाही. पण माझ्या मतदारसंघातील लोकांशी चर्चा घेऊन कठीण निर्णय घेण्याची वेळ आली. शिंदे साहेब आणि उदय सामंत यांनी मला अनेकदा फोन केली. धंगेकर आमच्याकडे या, अशी ऑफर दिली. आमच्यात मित्रत्त्वाचं नातं आहे.त्यामुळे एकत्र काम करण्याचे ठरवले. मी त्यांना सात वाजता भेटून पुढील निर्णय घेईन, असे रवींद्र धंगेकर यांनी म्हटले आहे.
