Explore

Search

April 7, 2025 2:23 am

IAS Coaching
लेटेस्ट न्यूज़

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा अर्थसंकल्पावर हल्लाबोल, व्हिजनलेस, कमिशन खाणाऱ्यांची फौज ते खंडणीखोरांचं राज्य ;

Prithviraj Chavan : काँग्रेस नेते  माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी महायुती सरकारचा अर्थसंकल्प व्हिजनलेस असल्याचं म्हटलं. राज्यात कमिशन खाणाऱ्यांची फौज व खंडणी खोरं याचं राज्य असल्याचं ते म्हणाले.

सातारा प्रतिनिधी  : राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी महायुती सरकारच्या पहिल्या अर्थसंकल्पावर सडकून टीका केली आहे. महायुती सरकारचा अर्थसंकल्प वित्तमंत्री अजित पवार यांनी सादर केला. या अर्थसंकल्पावर पृथ्वीराज चव्हाण यांनी टीका केली आहे. हा व्हिजन लेस अर्थसंकल्प असल्याचं त्यांनी म्हटलं.

राज्याची परिस्थितीची खूप हालाखीची आणि बिकट आहे. कर्ज आपण काढतोय पण कर्जाचे आकडे धोक्याच्या पातळीपर्यंत नाहीत, असं सरकार सांगतंय. परंतु, दरवर्षी कर्ज वाढत चाललंय, व्याज वाढत चाललंय, कर्जाचे हप्ते वाढत चालले आहेत. विकासकामं महत्त्वाची गोष्टी आहेत, शिक्षण, आरोग्य सामाजिक सुरक्षा याकडे दुर्लक्ष होत चाललंय. पायाभूत सुविधांची दुसरी बाजू असते जी कुणाला लक्षात येत नाही, काँट्रॅक्ट देता येतात. कमिशन खाता येतं. कमिशन खाणाऱ्यांची फौज या सरकारनं निर्माण केली आहे. महाराष्ट्रात नवी गुंतवणूक येत नाही याचं कारण महाराष्ट्र खंडणीखोरांचं राज्य आहे, अशी ओळख निर्माण झाली आहे. हा अर्थसंकल्प व्हिजनलेस असल्याचं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

खंडणीखोरांचं राज्य, कमिशन खाणाऱ्यांची फौज
पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्याची आर्थिक परिस्थिती बिकट असून शिक्षण आरोग्याकडे दुर्लक्ष झाल्याचं म्हटलं आहे. राज्यात कमिशन खाणाऱ्यांची फौज सरकारने निर्माण केल्याने महाराष्ट्र खंडणीखोरांचे राज्य आहे असे चित्र निर्माण झालंय. महाराष्ट्रात परदेशी गुंतवणूक त्यामुळं येत नाही अशी प्रतिक्रिया चव्हाण यांनी अर्थसंकल्पावर दिली.

काँग्रेस नेते नाना पटोले यांनी देखील महायुती सरकारवर अर्थसंकल्पावरुन टीका केली. सरकारनं जो जाहीरनामा निवडणुकीत दिला होता त्याची पूर्तता बजेटमध्ये करण्यात आलेली नाही. राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी गोलगोल आणि शेरोशायरीतच बजेट मांडलं. कुठून पैसे येणार कुठे खर्च होणार याचा उल्लेख नाही. संकल्पपत्रात 3 लाखाचे कर्ज माफ करण्याचं उल्लख झालेला नाही. लाडक्या बहिणीला 2100 रुपये देण्याचं सागितलं त्याची फसवणूक करण्यात आलेली आहे, असं नाना पटोले म्हणाले.

नाना पटोले पुढं म्हणाले की, अर्थसंकल्पात रोजगार निर्मितीची कुठलीही घोषणा नाही. महागाई कमी करण्यापेक्षा महागाई वाढवण्याचं ठरवलं आहे. हे फसवे सरकार असून महायुतीचा खरा चेहरा पुढे आणण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीचा राहणार ही भूमिका असल्याचं नाना पटोले म्हणाले. राज्यावर 8 लाखाचं कर्ज आहे. आणखी महाराष्ट्राला कर्जबाजारी करण्याचं काम हे सरकार करतयं, असं नाना पटोले म्हणाले.

Rayat Darpan
Author: Rayat Darpan

Leave a Comment

Live Tv
Advertisement
लाइव क्रिकेट स्कोर
Infoverse Academy