दिवंगत काँग्रेस नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची आज 112 वी जयंती असून त्यांच्या समाधीस्थळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपस्थित राहून अभिवादन केले.
“अलीकडे दोन्ही नेते महाराष्ट्राला शान होणार नाहीत अशी विधाने करतात. सुसंस्कृत महाराष्ट्र कसा असावा याची शिकवण दिवंगत यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राला दिली. दोन्ही बाजूच्या नेत्यांनी बोलताना कायदा आणि सुव्यस्थेच भान राखावे, ज्यांना देशाबद्दल प्रेम आहे असा मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात आहे, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नितेश राणे व जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्यावर दिली. तसेच जो पर्यंत राजकारणात आहे तोपर्यंत यशवंतराव चव्हाण यांची विचारधारणा सोडणार नसल्याचे देखील पवार यांनी म्हंटले.
यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, “सुसंस्कृत महाराष्ट्राची शिकवण यशवंतराव चव्हाण यांनी दिली. यशवंतराव चव्हाणांची शिकवण पुढे नेण्याचा प्रयत्न आहे. यशवंतराव चव्हाणांची विचारधार कधीही सोडणार नाही” “जो पर्यंत मी राजकीय जीवनात आहे, तो पर्यंत चव्हाण साहेबांची विचारधारा मी कदापी सोडणार नाही किंवा ढळू देणार नाही. त्याच विचारधारेने महाराष्ट्राच भलं होणार, सगळ्या समाजाच भलं होणार आहे. चांद्यापासून बांद्यापर्यंत महाराष्ट्राच्या सर्व घटकांना न्याय देण्याच काम होणार आहे,”
इतिहास आपण वाचला आहे. इतिहासात अनेक मोठमोठ्या लोकांनी जी काही पुस्तक लिहिली आहेत, इतिहासाच संशोधन केलं आहे. इतिहासाची माहिती खोलवर मिळवली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर जे लोक होते, त्यात मुस्लिम लोक सुद्धा आहेत. दारुगोळा कोण संभाळत होतं? त्याची कितीतरी उदहारण आपल्याला देता येतील. त्यांनी अस वक्तव्य का केलं? त्यांच्या वक्तव्यामागचा हेतू माहित नाही, पंरतु आपल्या देशाबद्दल अभिमान वाटणारे जो मुस्लिम घटक आहेत, ते देशप्रेमीच आहेत” असं अजित पवार म्हणाले.
यावेळी मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, आमदार अतुल भोसले, मनोज घोरपडे, सचिन पाटील, माजी आमदार बाळासाहेब पाटील, जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराज आदी उपस्थित होते.
