Explore

Search

April 4, 2025 7:54 am

IAS Coaching
लेटेस्ट न्यूज़

साताऱ्यात स्मार्ट जि. प. शाळा व आरोग्य केंद्रात ठेकेदारांची सरशी , पण नीट बसेना फरशी !

सातारा प्रतिनिधी :  सातारा जिल्ह्यामध्ये महायुतीचे निर्विवाद वर्चस्व असून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पुढे ढकलण्यामध्ये स्मार्ट पणा करणाऱ्या सत्ताधाऱ्यांना विरोधक उरला नसल्याने आता कोणतेही भय राहिलेले नाही. त्यामुळे आता साताऱ्यात स्मार्ट जि.प. शाळा व आरोग्य केंद्रात ठेकेदारांची सरशी, पण नीट बसेना फरशी…. अशी ग्रामीण भागामध्ये चर्चा सुरू झालेली आहे.

याबाबत सत्यता पडताळणी करण्यासाठी शिक्षण, आरोग्य व बांधकाम विभागाने एकत्रितरित्या पाहणी दौरा आयोजित करावा. म्हणजे एकमेकांवर नाकर्तेपणाचा थपका ठेवला जाणार नाही. अशी मागणी महायुतीतील घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जावळी तालुका अध्यक्ष साधू चिकणे यांनी साताऱ्यात पत्रकारांशी बोलताना केलेली आहे.

सातारा जिल्ह्यातील स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र व मॉडल स्कूल पॅटर्न दोन महिन्यात पूर्ण करण्याची घोषणा त्याकाळी मंत्रिमहोदयांनी जानेवारी महिन्यात केली होती. अजून काही ठिकाणी कामाची गती दिसून येत नाही. जिल्हा नियोजन मंडळाकडून १५३ कोटी रुपयांची रसद पुरवण्यात आली आहे. त्या जोडीला सातारा जिल्हा परिषद स्थानिक निधी, सी.एस.आर. फंड, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान निधी देण्यात आलेला आहे.

प्रत्येक तालुक्यात एक शाळा व एक प्राथमिक आरोग्य केंद्र प्रायोगिक तत्त्वावर स्मार्ट बनवण्यासाठी ठेकेदारांनी दस्तुरखुद मंत्र्यांनीच कामाचे वाटप करून घेतलेले आहे. अशी तक्रार काही वरिष्ठ करत आहेत. परंतु त्याबाबत उघडपणाने बोलले जात नाही. राज्यात पहिल्यांदाच सातारा जिल्हा मध्ये नाविन्यपूर्ण उपक्रम राबवल्या आल्याने सर्वांनी त्याचे तोंड भरून कौतुक केले आहे.
सार्वजनिक आरोग्य सेवेचा दर्जा उंचावला तर ग्रामीण भागात दर्जेदार आरोग्य सेवा मिळेल यासाठी स्मार्ट प्राथमिक आरोग्य अभियान योजना राबविण्यात आली आहे. या अभियानांतर्गत सतरा प्राथमिक आरोग्य केंद्रांची निवड झाली. येत्या जून पर्यंत दहा स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्रे तयार करा, अशा सूचनाही पालकमंत्री श्री. देसाई यांनी दिल्या.

सातारा जिल्ह्यातील स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र अभियानातील कामे ही दर्जेदार होण्यासाठी अधिकाऱ्यांची नेमणुक करावी. निधी कमी पडत असल्यास आणखीन निधी दिला जाईल. स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये सोलर एनर्जी, रेन वॉटर हार्वेस्टिंग, आयुष हर्बल गार्डन याच्या निर्मितीबरोबर या अभियानासाठी मंत्री महोदय विशेष प्रयत्न करत आहेत. ग्रामीण भागातील नागरिकांना
जास्तीत जास्त चांगल्या आरोग्य सुविधा कशा उपलब्ध होतील यासाठी प्रयत्न करावा, असेही पालकमंत्री श्री. देसाई यांनी सांगितले.

याबाबत ते सातत्याने बैठका घेत असल्या तरी प्रत्यक्षात मात्र ग्रामीण भागामध्ये स्मार्ट शाळा व आरोग्य केंद्राच्या नावाने काही सराईत ठेकेदारच स्मार्ट बनत चाललेले आहेत. एवढेच नव्हे तर आपल्या मर्जीतील ठेकेदारांना ठेका मिळावा. त्यामध्ये अडथळा करणाऱ्या अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याची नवीन योजनाही राबविण्यात आलेली आहे.

सातारा जिल्हा परिषदेमध्ये  प्रामाणिकपणाने विकास कामांमध्ये योगदान देणारे अनेक ठेकेदार आहेत त्यांच्या प्रामाणिकपणाबद्दल ग्रामस्थ सुद्धा त्यांच्याकडून कामे करून घेण्यात उत्सुक आहेत. परंतु ग्रामस्थांना यामध्ये कोणताही सहभाग घेता येत नाही अशी खंत व्यक्त केली आहे.

सातारा जिल्ह्यातील ५६ जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा आदर्श शाळा करा , आदर्श शाळा उपक्रमाचा आढावा घेताना पालकमंत्री श्री. देसाई यांनी सांगितले होते. यामध्ये मुलांच्या अत्याधुनिक शिक्षण मिळावे यासाठी एक मॉडेल तयार करावे हे मॉडेल पूर्ण जिल्ह्यात वापरावे. असेही आढावा बैठकीत सांगितले. परंतु आढावा बैठकीमध्ये कागदी घोडे नाचून अधिकारी काही गोष्टी लपवून ठेवत असल्याची ग्रामस्थांनी सांगितली. त्याकडे लक्ष देण्यास सत्ताधाऱ्यांना वेळ नसल्याची ही टीका होऊ लागलेली आहे.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत प्रामुख्याने विज्ञान व गणित प्रयोगशाळा, ग्रंथालय, संगणक कक्ष, परिसर सुशोभीकरण, ई-लर्निंग यासह विविध सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात. सातारा जिल्ह्यात दहा ई-लर्निंग स्टुडिओ उभारण्यात येणार असून यासाठी अंदाजे दहा ते बारा लाखापर्यंतचा खर्च येतो. हे स्टुडिओ इंटरनेट सुविधा उपलब्ध आहे अशा ठिकाणी तयार करावे. यासाठी तालुक्याच्या ठिकाणच्या स्टुडिओमध्ये संबंधित शिक्षकाला प्रशिक्षणही द्यावे, असेही पालकमंत्री श्री. देसाई यांनी यावेळी सांगितले होते. याबाबत जिल्हा परिषद शाळा व प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन शिक्षण आरोग्य व बांधकाम विभागाने संयुक्तरीत्या पाहणी केली नाही असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. त्याला दुजोरा देण्याचे काम सत्तेतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेच केल्यामुळे महायुतीच्या कामकाजाबाबत जो बूंद से हो हौद से नहीं आती याची प्रचिती साधू चिकणे यांनी करून दाखवले आहे. दरम्यान, याबाबत संबंधित विभागाने आरोपाबाबत बोलण्यास नकार देऊन स्मार्ट शाळा व स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्राचे काम वेगाने चालले असल्याचे निसंकोच पणाने सांगितले. संयुक्त पाहणी दौरा आखण्याची जबाबदारी वरिष्ठांनी घ्यावी असेही त्यांनी नमूद केले आहे.

Rayat Darpan
Author: Rayat Darpan

Leave a Comment

Live Tv
Advertisement
लाइव क्रिकेट स्कोर
Infoverse Academy