जिवन आणि मृत्यु या मधील सत्कर्म हाच मोक्षाचा मार्ग – श्री. अमित कदम सातारा जावली नेते यांनी श्री सावळाराम दगडू आगुंडे (पोस्ट मास्तर ) यांच्या प्रथम पुण्या स्मरणा निमित्त आदरांजली वाहून मत व्यक्त केले .!
जावली प्रतिनिधी ; मौजे म्हावशी ता.जावली जि.सातारा येथील वैकुंठ-वासी श्री सावळाराम दगडू आगुंडे (पोस्ट मास्तर ) यांच्या प्रथम पुण्य स्मरणाच्या निमित्ताने आयोजीत कार्यक्रमाला अनेक क्षेत्रातील मान्यवरांनी आदरांजली वाहिली. श्री तानाजी आगुंडे यांना आपल्या वडिलांच्या सामाजिक कार्याचा वारसा हा मिळाला आहे. त्यांचे अपूर्ण काम आपल्या हातुन पूर्ण होतील. अशी अपेक्षा ही श्री.कदम यांनी केली.
श्री.तानाजी आगुंडे हे शिक्षक असून यांच्या वडिलांच्या पाश्च्यात आगुंडे सर व त्यांचे बंधू आपल्या वडिलांचा वारसा चालवत सामाजिक व शैक्षणिक कार्यात अग्रेसर राहतील व शैक्षणिक कामाच्या माध्यमातून सुशिक्षीत व संस्कारक्षम पिढी घडवेल. या भावना व्यक्त केल्या.
सदर कार्यक्रमास ह.भ.प.निकम (महाराज) यांनी प्रथम किर्तन करून आदरांजली वाहिली, तसेच श्री साधू चिकणे, श्री रवींद्र शेलार, श्री उदयजी शिंदे (गुरुजी), श्री राम पवार, श्री राम शिंदे, श्री जगदाळे , धनाजी सपकाळ (पाटील) आदि मान्यवर उपस्थित होते.
